——————————————-
भारतीय नारी रक्षा संघटनेची मागणी
——————————————-
राळेगाव तहसिलदार व ठाणेदारा मार्फत निवेदन
——————————————-.
राळेगाव-: घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथिल आशा वर्कर आरोग्य केंद्रात जात असताना तेथील उपसरपंच मधुसूदन मोहूरले याने आशा वर्कर गंगा कूमरे आणि कालिंदा डहाके या दोघीवर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे अख्ख्या जिल्ह्यातील आशा वर्कर महिला मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अश्या प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधींकडून झालेला हल्ला संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. अश्या गुंड प्रवृत्तीच्या हल्लेखोर उपसरपंच मधुसूदन मोहुरले यांचे उपसरपंच पदावरून खारीज करावे आणि त्यांच्यावर शासकिय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पारवा पोलिसांनी भादवी कलम ३५३ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसह राळेगाव तालुका भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतीने राळेगाव तहसिलदार व ठाणेदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना संघटनेच्या तालुका अध्यक्षा सौ. संतोषी रा. वर्मा, करुणा ताई वानखेडे (आशा वर्कर शेळी), शैलेश आडे, रोशन बावणे, विजय मुंडाली, राजजी वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
