——————————————-
९०% लाभ घेणारी पहिली ग्राम पंचायत
——————————————-
घाटंजी(तालुका प्रतिनिधी) देशात कोरोनाची पहिली लाट आली आणि चार महिन्यांनंतर शिथिलता मिळाली त्यामुळे दुसरी लाट निर्माण होवून बहुसंख्य नागरिक बाधित झाले. ही बाब लक्षात घेवून शासन व प्रशासनाने दक्षता घेवून शहरी भागासह ग्रामीण भागात कॅम्प घेवून जनजागृती करीत लसीकरण मोहीमेस सुरुवात केली यात घाटंजी तालुक्यातील येरंडगाव येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये ९०% नागरिकांनी लसीकरण घेवून तालुक्यात प्रथमतःच मोठ्या प्रमाणात लसीचा फायदा घेत ही पहिली ग्राम पंचायत असून त्यांनी मानाचा तुरा रोवल्याचा सर्विकडे चर्चा होत आहे.
दिनांक ५ जुन रोजी येरंडगाव ग्राम पंचायत अंतर्गत ही लसीकरण स्थानिक जि. प. शाळेमध्ये करण्यात आले. यामध्ये ४५ वयोगट वर्षांवरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत ६० लाभार्थ्यांने या लसीचा लाभ घेतला. यासाठी गावात लसीकरण का करून घ्यावे याबाबत सरपंचा सौ. दिपाली प्रफुल गावंडे, उपसरपंच श्री. अमोल कृष्णराव ठाकरे, ग्रामसेवक श्री. मंगेश कुऱ्हाडकर, यांनी गावात जनजागृती करीत लोकांना लसीचे महत्व पटवून दिले. सोबतच भविष्यात दुसऱ्या लाटेसोबतच तिसरी लाट येवू नये. त्याला वेळीच आला बसावा. एखादा नागरिक बाधित झाला आणि अनवधानाने यात जीव गमावला तर परिवाराचे काय हाल होतील. यावर विशेष भर देवून समजावून सांगितले त्यामुळे या गावात चांगलीच जनजागृती होवून ९०% नागरिकांनी लसीकरण करून घेतले एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेणारी ही पहिलीच ग्राम पंचायत असल्याने या ग्राम पंचायतीची तालुक्यात वाह वाह होत आहे. या आरोग्य विभागा मार्फत राबविलेल्या कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबिरासाठी सरपंचा दिपाली गावंडे, उपसरपंच, अमोल ठाकरे, ग्रामसेवक मंगेश कुऱ्हाडकर, तलाठी प्रेमिला सिडाम, संगणक परिचालक प्रफुल गावंडे, आरोग्य विभागाचे भाऊ वातिले, भाऊ भरणे, ताई वंजारे, ग्राम पंचायत कर्मचारी किशोर मोगरे, आशा वर्कर संगीता जाधव, हे उपस्थित राहून अथक परिश्रम घेत शिबिर यशस्वी पार पाडले. यानंतरही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करीत ज्या नागरिकांनी लसीकरण करून घेतले त्यांचे व आरोग्य विभागाचे सरपंच गावंडे यांनी खूप खूप आभार मानले.
