५ जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरू झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे. वसुंधरेची चिंता असलेले त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भुकंप, ढगफुटी, महापुर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तिने उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखु आणि ख-या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु. हिवरी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र व स्मशानभूमीच्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.व नागरीकांना पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपसरपंच अभिजीत मुरखे, ग्रा.पं सदस्य अनंता राऊत, संध्या अतकारी, विनिता चेके,ममता खोडकुंभे, सुषमा राऊत,
प्रा. आ. केंद्र हिवरी येथील कर्मचारी शितल देठे व श्री. ईटकरे उपस्थित होते.
