Home यवतमाळ सांस्कृतिक सेल तर्फे परिचारिकांचा सत्कार

सांस्कृतिक सेल तर्फे परिचारिकांचा सत्कार

26

आज मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 7 वर्षपूर्ती झालीत,याचे औचित्य साधून जयविजय चौक येथील गणपती मंदिर येथे भारतीय जनता पार्टी प्रणित सांस्कृतिक सेल तर्फे मा.आमदार मदनभाऊ येरावार,मा.नितीनभाऊ भुतडा-जिल्हाध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली परिचारिका/परिचर यांचा COVID-19 योद्धा म्हणून सत्कार घेण्यात आला…या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राजुभाऊ पडगीलवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.सुजय राय-नगरसेवक-प्र. क्र.15,डॉ.सुधीर भोईटे,इंजि. रवी ढगे हे होते…प्रस्तावना सौ.स्मिताताई भोइटे सांस्कृतिक सेल-जिल्हाध्यक्षा यांनी केले दरम्यान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला…मा.सुजय राय यांनी मोदीजी तसेच 7 वर्षांपासून अनेक विकसित कार्य भारताला दिलेत त्यांची प्रेरणा घेऊन प्रभाग क्र.15 मध्ये विकसित कार्य हाती घेतले व अनेक विरोधकांचे संकट-विरोध पत्करून सत्कार्य केलेत…नंतर, मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 7 वर्ष पूर्ण झालेत हे औचित्य साधून 7 परिचारिका विद्या श्रीवास्तव(परिचारिका),बबिता तान्द्रा(अधिपरिचरिका),वैशाली कोवर(अधिपरिचरिका),शिवानी श्रीवास्तव(अधिपरिचरिका,COVID-19 फोर्स,नागपूर),कैलाश धवणे(कक्षा सेवक) ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता कोरोना महामारीत लोकांची सेवा केली..अनेक डॉक्टर व परिचारिका हे सत्कार्य करता-करता शहीद झालेत तरी त्यांनी आपला ध्यास,आपला मानस,आपले कर्तव्य विसरले नाहीत आणि संकटांना न जुमानता कार्य करीत राहिले….अश्या धाडसी परिचारिकांचा/परिचर तसेच भूमिका सुजय राय,पांडुरंग गाडेकर(वार्ड शिपाई प्र. क्र.15) यांचा सत्कार भाजपा प्रणित सांस्कृतिक सेल द्वारे घेण्यात आला…दरम्यान त्यांना वन औषधी,आयुर्वेदिक आयुष काढा व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विवेक चौधरी,परिचारिका सौ.विद्याताई श्रीवास्तव यांनी धैर्य देणारे गीत गाऊन सर्वांचे अभिनंदन केले,आभार प्रदर्शन मा.अमित नानेटकर यांनी केले…कार्यक्रमाला पूर्णत्वास नेण्यास सौ.स्मिताताई भोईटे,सांस्कृतिक सेल-जिल्हाध्यक्षा,मा.रामभाऊ गायकवाड,डॉ.उबाळकर ,अडगूलवार साहेब, इंजी.रवी ढगे,स्मिता भट इ.श्रम घेतले…

Copyright ©