यवतमाळ – कुशल प्रशासक, पराक्रमी राज्यकर्त्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आ. संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. संजय राठोड, त्यांच्या सहचारिणी शीतल संजय राठोड, मुलगी दिव्या राठोड व परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमी राज्यकर्यादन कुशल प्रशासक, रणनितीकार, न्यायप्रिय म्हणून राजमाता अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला, असे यावेळी बोलताना आ. संजय राठोड म्हणाले. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
फोटो – राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना आ. संजय राठोड, शीतल राठोड.
