Home यवतमाळ वीरशैव हितसंवर्धक मंडळ व वसुधा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य...

वीरशैव हितसंवर्धक मंडळ व वसुधा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

77

वीरशैव हितसंवर्धक मंडळ व वसुधा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

२७ जुलै रोजी यवतमाळात
वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठान, यवतमाळ या दोन समाजाभिमुख संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक गौरवशाली उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील *वृद्धांचा सन्मान आणि नव्या पिढीच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करणे होय. समाजात योगदान देणाऱ्या ७० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांचा तसेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांमध्ये ८०% किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, उच्च शिक्षण पूर्ण करणारे, विशेष कौशल्य प्राप्त करणारे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणारे विद्यार्थीही सत्कारासाठी पात्र ठरणार आहेत.
या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे समाजामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे आणि तरुण पिढीला यशस्वीतेच्या दिशेने मार्गदर्शन करणे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या अनुभवातून समाजाला दिशा मिळावी, यासाठी त्यांचा सार्वजनिक सत्कार केला जाणार आहे.
सत्कारासाठी इच्छुकांनी २० जुलै २०२५ पर्यंत आपली माहिती संयोजकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी संपूर्ण नाव, शैक्षणिक निकालाची प्रत किंवा यशाचा तपशील यांची माहिती देणे आवश्यक आहे.
समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समाजातील गुणवंत व्यक्तींचा गौरव वाढवावा, असे आवाहन वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अअध्यक्ष आणि वसुधा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Copyright ©