Home Breaking News दोन दुचाकी अपघातात एक जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर

दोन दुचाकी अपघातात एक जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर

121

दोन दुचाकी अपघातात एक जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत हिवरी समोर परस्पर दुचाकी ऐक मेकास धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

सवि.असे की राष्ट्रीय राज्य महामार्ग नागपुर तुळजापूर मार्गावरील हिवरी समोर एक की. मी.अंतरावर दुचाकी क्र. एम एच 29 सी इ.5481 ॲक्टिव्हा विरुद्ध दिशेने येत असता त्या वरील प्रकाश हरिभाऊ वाघाडे वय 58 रा.हिवरी ता.जी.यवतमाळ तर यवतमाळ कडून आर्णी कडे जाणारी दुसरी मोटर सायकल एम एच 37 एन/5272 सतीश रोहिदास शिंदे वय 40 रा.फाळेगाव ता.मंगरूळपीर हा गंभीर जख्मी असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. हि अपघात सायंकाळी 7.30 घडला प्रकाश हरिभाऊ वाघाडे याच्या मागे पत्नी दोन मुली एक मुलगा असा आप्त परिवार असून या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस तपास करीत आहे.

Copyright ©