Home यवतमाळ सरपंच पदासाठी 17 व 18 जुलैला सुधारीत आरक्षण सोडत

सरपंच पदासाठी 17 व 18 जुलैला सुधारीत आरक्षण सोडत

73

सरपंच पदासाठी 17 व 18 जुलैला सुधारीत आरक्षण सोडत

यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी दि. 17 व 18 जुलै रोजी सुधाउ आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या त्या तालुका ठिकाणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

दि. ५ मार्च २०२५ ते दि. ४ मार्च २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्याकरीता जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दि.17 व 18 जुलै रोजी संबंधित तहसिल स्तरावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र महिला आरक्षणासह सरपंच पदाकरीता सुधारीत सोडत घेण्यात येणार आहे.

यवतमाळ तालुक्यात ग्रामपंचायत निहाय आरक्षण निश्चित करण्याची दि. 17 जुलै रोजी, बाभूळगाव तालुक्यात 18 जुलै, आर्णी तालुक्यात 17 जुलै, दारव्हा तालुक्यात 17 जुलै, नेर तालुक्यात 18 जुलै, पुसद तालुक्यात 17 जुलै, दिग्रस तालुक्यात 18 जुलै, उमरखेड तालुक्यात 17 जुलै, महागांव तालुक्यात 18 जुलै, राळेगांव तालुक्यात 17 जुलै, कळंब तालुक्यात 18 जुलै, वणी तालुक्यात 17 जुलै, मारेगांव तालुक्यात 18 जुलै, केळापुर तालुक्यात 17 जुलै, घाटंजी तालुक्यात 18 जुलै, व झरी जामणी तालुक्यातील सरपंच पदासाठी 17 जुलैला सुधारीत सोडत काढण्यात येणार आहे.

यासाठी उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी तसेच तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी उपस्थित राहणार आहे. सरपंच आरक्षण सुधारीत सोडत सभा दि. 17 व 18 जुलै रोजी दुपारी १२ वाजता संबंधित तहसिल कार्यालय येथे आयोजित केलेली असून संबंधित नागरीक व ग्रामपंचायत सदस्यांनी सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Copyright ©