वसंतराव नाईक यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार
हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती संकट मोचन चौक, यवतमाळ येथे बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळ यांच्यावतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात लोकनेते वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे शेतकरी प्रेम,दुष्काळमुक्तीसाठीचा संघर्ष आणि देशाला हरित क्रांतीकडे नेणाऱ्या भुमिकेचा उल्लेख करण्यात आला.या वेळी
कार्यक्रमास मा. चंद्रशेखर चौधरी जेष्ठ मार्गदर्शक, लोकेश इंगोले समाजसेवक, सौ. मिनाक्षी ताई सावळकर महिला नेत्या
सौ. विद्या ताई पाताळबंशी सौ, सरस्वती ठाकुर सौ. सुमन ताई चव्हाण सौ. कांताबाई पवार सौ. रजनी ताई वाघाडे सौ. शिमाताई शिरोडकर सौ. कल्पना ताई मुनेश्वर सौ. ममता ताई मिश्रा
या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उपस्थित सर्वांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यास अभिवादन करत, त्यांच्या स्वप्नातील शेतकरी आणि समृद्ध भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजन आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले.
