Home यवतमाळ शासकीय आश्रम शाळा हिवरी येथे प्रवेश उत्सव साजरा

शासकीय आश्रम शाळा हिवरी येथे प्रवेश उत्सव साजरा

100

शासकीय आश्रम शाळा हिवरी येथे प्रवेश उत्सव साजरा

हिवरी येथे शासकीय आश्रम शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला प्रथम प्रमुख अतिथीचे सावंस्कृतीक पद्धतीने लेझिम पथक ठेवून स्वागत करण्यात आले रांगोळीने परिसरास सजून सुशोभित करण्यात आले होते.

हिवरी शासकीय आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश उत्सव दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले  शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये दि. २७ जून रोजी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  मा. एम. के. उके अपर आयुक्त, अमरावती यांचे मार्फत प्रतिनिधी म्हणून मा.गायकवाड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र अगलधरे, पोलिस पाटील दिगंबर शहारे,,प्राचार्य राजेश उगे ,संतोस शेंणमारे , नितीन चारोळे,डी.एम.तडसे, तसेच सर्व शालेय कर्मचाऱ्याची प्रमुख उपस्थिती या वेळी विद्यार्थ्यांसोबत ग्रंथ दिंडी,वृक्ष दिंडी काढण्यात आली , प्रमुख अतिथी च्या हस्ते वृक्षारोपण करून  पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रंथदिंडी व प्रभातफेरीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले.

नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.. विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके  वाटप करण्यात आली..

विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात गोंडी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा, नागपूर येथे बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन देण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली.सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोहर उके , प्राचार्य राजेश उगे, संतोष आर. शेणमारे, के.ए.वावरे,प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©