राज्य शासनाच्या निर्णयानुसार यवतमाळात सराफा संघटनेची दक्षता समिती स्थापन
सराफांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसात ‘दक्षता समिती
चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी सराफी व्यावसायिकांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. त्यातून अनेकदा निर्दोष सराफांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयात राज्यस्तरीय दक्षता समिती तर, पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालयात दक्षता समितीची स्थापना करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. तसेच, अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना पोलिसांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याची सराफा संघटनेची दक्षता समिती गुरुवारी (ता.२७) स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी रत्नाकर पजगाडे, सारंग भालेराव, शैलेश लष्करी, संदीप कदम यांची नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलिस अधिक्षक पीयुष जगताप यांना माहितीपत्र देखील देण्यात आले आहे.
सराफा संघटनेच्या दक्षता समिती कार्यकारीणीत सचिवपदी निलेश राठी, सुरेंद्र लुणावत, अजित मोरे, जयंत येरावारे, किशोर पालतेवार, सुभाष मस्के, राजु शहा, संदीप कदम, मनोज कैपिल्यवार, ओंकार बिन्नोड, सचिन कैपील्यवार आदींचा समावेश आहे.
रत्नाकर पजगाडे यांच्या उपस्थितीत अप्पर पोलिस अधिक्षक पीयुष जगताप यांना सराफा संघटनेची दक्षता समितीबद्दल माहिती देण्यात आली.
गृहविभागाकडून परिपत्रक जारी
या अधिसूचनेमुळे राज्यातील सराफ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चोरीचे सोने खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून सराफ व्यावसायिकांना अटक करून चौकशी केली जाते. गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून सराफ व्यावसायिकांकडून शासनाकडे मागणी होती. त्यानुसार, गृहविभागाने परिपत्रक जारी केले आहे.
सराफांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये
पोलिस महासंचालक कार्यालयात राज्यस्तरीय दक्षता समिती, तर पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालयात दक्षता समिती करणे, या समितीची राज्यस्तरावर वर्षातून एकदा तर, आयुक्तालय-अधीक्षक कार्यालयांतर्गत तीन महिन्यांनी एकदा बैठक घेणे, सोने चोरीच्या गुन्ह्यात अटक संशयिताची पंच समक्ष चोरीच्या मुद्देमालाची चौकशी करणे, सराफाची चौकशी करताना त्यांच्याकडील नोंदवहीत नोंद करावी, तपासी अधिकारी याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही कार्यवाही करू नये, सराफांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, अशा सूचनांचे पालन करण्याबाबत पोलिसांचा सूचित करण्यात आले आहे. गृहविभागाचे उपसचिव राजेश गोविल यांनी सदरचे परिपत्रक जारी केले आहे.
सराफांनाही सूचना
सराफी व्यावसाय करणाऱ्यांची अद्ययावत यादी स्थानिक पोलिस ठाण्यास द्यावी, दागिने विक्री वा गहाण ठेवण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून अधिकृत ओळखपत्र घ्यावे, संशयित गुन्हेगार दागिने विक्रीसाठी आल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी सुरक्षिततेसाठी दुकानात अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तपासात सराफाने पोलिसांना सहकार्य करावे,
