मराठीसाठी भरीव योगदान देणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचा मनसेच्या वतीने साडीचोळी देऊन सत्कार
मराठी राजभाषा दिन साजरा.
२७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती आणि याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो . वास्तविकतेत मनसेच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने आपल्याला सर्वप्रथम अक्षराची ओळख करून देणाऱ्या गुरु म्हणजे अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविकांचे मराठीसाठी योगदान भरीव असे आहे, लहान बाळाला आई नंतर अक्षरांची खरी ओळख करून देणारी म्हणजे अंगणवाडी सेविका याच अंगणवाडी सेविकांचा मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या हस्ते आज मराठी भाषा दिनानिमित्त यवतमाळ लगतच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि मराठी भाषा अमर करण्यामध्ये त्यांच्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे न फेडण्यात येणारे ऋण म्हणून हा मनसेचा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या सत्काराच्या रूपाने करण्यात येत असल्याचे मत याप्रसंगी अनिल हमदापूरे यांनी व्यक्त केले . याच वेळी अंगणवाडीतील सर्व उपस्थित मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी मनसेचे लकी छांगाणी, सुरज गुप्ता, तुषाल चोंडके,अनिकेत सुरटकर, अक्षय सयाम,अनिकेत मीठे,अमोल ठाकरे, मयूर कारंजकर पद्मनाभ जोशी तर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
