Home यवतमाळ लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल रुई वाई येथे सांस्कृतिक...

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल रुई वाई येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

95

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल रुई वाई येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल रुई वाई येथे दिनांक 03/02/2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश मुस्कंदे सर (अध्यक्ष ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटर, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त भारत सरकार, उदघाटक म्हणून लाभलेले सुरज भाऊ खोब्रागडे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यवतमाळ, संस्थेचे अध्यक्ष इमदादअली काझी,पत्रकार सुशिलजी करनेवार, पोलीस पाटील शाम भगत, स्कुल चे मुख्याध्यापक जावेदअली काझी, बाळू भाऊ राठोड,सुनील भाऊ राऊत,पालक किशोर भाऊ राऊत, सुनील भाऊ गंथडे, किशोर भाऊ आग्रे, महेबूब चाचा, इम्रान शेख, शहजाद शेख तालुका अध्यक्ष रा. कॉ. पक्ष शरद पवार आर्णी, रियाज खान शहर अध्यक्ष आर्णी रा. कॉ शरद पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना विध्यार्थ्यानी वाजत गाजत गेट पासून फुलांचा पुष्प वर्षाव करीत स्टेज वर आणले.त्या नंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन आणि दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुस्कंदे सर यांचा सत्कार स्कुल चे मुख्याध्यापक जावेदअली काझी सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच सुरज भाऊ खोब्रागडे यांचा सत्कार स्कुल चे मुख्याध्यापक जावेदअली काझी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच इतर मान्यवरांचे स्वागत शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर मुस्कंदे सर अध्यक्षीय भाषण करीत संस्थेचे अध्यक्ष स्व जुनेदअली काझी आणि जावेदअली काझी यांनी गरीब विध्यार्थ्यांना चांगले इंग्लिश शिक्षण मिळावं त्या साठी माजी सरपंच असलेले त्यांचे काका स्व. अल्ताफ अली काझी यांच्या नावाने स्कुल काढली आणि सगळं सुरळीत चालू असताना दुर्दैव असे कि स्व. जुनेदअली काझी सर यांचं कोरोनात दुःखद निधन झालं ही शैक्षणिक सर्व जबाबदारी आता एकट्या जावेद सर यांच्या वर आली तरी ते हिम्मत न हारता आपल्या स्वर्गवासी मोठ्या भावाचे स्वप्न शैक्षणिक कार्य अविरत चालू ठेवत स्कुल ला प्रगतीपतावर नेत आहे स्कुल च्या शैक्षणिक कार्याबद्दल, स्कुल च्या शिक्षणा बद्दल, इतर ऍक्टिव्हिटी बद्दल जावेदअली काझी सर यांच्या सामाजिक कार्य बद्दल जनतेला व विध्यार्थ्यांना माहिती देत स्कुल कौतुक केले . छोट्याशा गावात गरीब मुलांना दर्जेदार इंग्लिश शिक्षन देत असताना खूप संकटाणा सामोरे जावे लागते आणि खूप मेहनत करावी लागते त्या साठी जावेद सर नेहमी शैक्षणिक कार्य सोबत सामाजिक कार्यात पण अग्रेसर असतात असे उदगार काढीत प्रेक्षकांना माहिती दिली त्या नंतर सुरज भाऊ खोब्रागडे यांनी आपले मत स्पष्ट करीत असताना डॉ. बाबासाहेबानी म्हटलं होत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो याला पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही आणि सलाम आहे जावेद सर तुमच्या कार्यला आणि छोट्याशा खेड्यात चांगले शिक्षण देत आहे असे मत स्पष्ट करीत स्कुल चे कौतुक केले. त्या नंतर आमचे हैद्राबाद येथे इंजिनियर असलेले बंधू शारिकअली काझी यांनी रुई या गावात खूप कठीण प्रसंग येऊन ही गरीब विध्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देत बेस्ट इंग्लिश स्कुल अचिव्हमेंट अवॉर्ड स्कुल ला भेट दिली आणि ही ट्रॉफी सतीश मुस्कंदे सर, सुरज भाऊ खोब्रागडे पत्रकार करनेवारजी इतर मान्यवरांच्या हस्ते स्कुल चे मुख्याध्यापक जावेदअली काझी तसेच स्कुल चे सर्व शिक्षक विध्यार्थी यांना देऊन स्कुल गौरव करण्यात आला.

त्या नंतर विध्यार्थ्यानी विविध प्रवीण्य प्राप्त केल्या बद्दल बेस्ट व्हालिबाल प्लेयर आरसलानअली काझी, कबड्डी आरव जगताप, क्रिकेट तन्मय चौधरी, बेस्ट डान्सर श्रेया गंतडे, स्टुडन्ट ऑफ द इअर मृणाली ढेकाळे, म्युझिकल चेअर पालक अश्विनीताई ढेकाळे लेमन स्फून अर्णव श्रीरामे, रनींग मित मजेठिया असे ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले.त्या नंतर स्कुल तर्फे जे शिक्षक विध्यार्थ्यांना ज्ञानर्जनाचे कार्य करतात विध्यार्थ्यांना हुशार करतात चांगले संस्कार करतात स्कुल साठी दिवस रात्र मेहनत घेतात त्या शिक्षकांना मान सन्मान म्हणून मुख्याध्यापक जावेदअली काझी सर यांनी सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्न मोमेन्टो देऊन त्या सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षक रीना केवट,दिनेश गायकवाड, नम्रता केवट, आरती आत्राम, सायमा सय्यद, तबसूम चाऊस, सानिया सय्यद इत्यादी चा गौरव कारण्यात आला. त्या नंतर विध्यार्थ्यानी पहिले गाणे सादर करीत शेतकरी नृत्य सादर करून शेतकरी कसा राहतो, तो अस्मानी संकटाचा कसा सामना करतो हे सर्व नृत्यच्या माध्यमातून प्रेक्षकांना फलक चित्रे दाखून दिले त्या नंतर विशेष आकर्षण म्हणजे कव्वाली चा गाणं खूप सुंदर आणि सर्वत्र चर्चेचा विषय झाला अतिशय सुंदर अशी विध्यार्थांनी शिक्षकांनी कव्वाली सादर करीत प्रेक्षकांचे म्हणे जिंकली.

सूत्र संचालन स. शिक्षिका. नम्रता केवट यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जावेदअली काझी, रीना केवट, दिनेश गायकवाड, सायमा सय्यद, आरती आत्राम, तब्बसूम चाऊस, सानिया सय्यद, शारदा भोमबारे,संध्या मोहळे,सय्यद अनिस, राजिक शेख, ब्रम्हा राठोड पालक गावकरी व मित्र मंडळ यांनी मेहनत घेतली.

Copyright ©