Home यवतमाळ मनोज कटकतलवारे यांना”कला गौरव पुरस्कार”

मनोज कटकतलवारे यांना”कला गौरव पुरस्कार”

85

मनोज कटकतलवारे यांना”कला गौरव पुरस्कार”

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने सन्मानित छायाचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन

यवतमाळ दि.१० : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त प्रसिद्ध वृत्तपत्र छायाचित्रकार मनोज कटकतलवारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सोबतच त्यांच्या विशेष छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी ४ या वेळेत केले होते. या ऐतिहासिक विशेष अनोख्या छायाचित्र प्रदर्शनाचा आस्वाद घेण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार व रशिक आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती .

दरवर्षी ६ जानेवारी हा महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी येथील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कटकतलवारे यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. पत्रकारिता आणि छायाचित्रण क्षेत्राच्या वाढीस चालना मिळावी यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे कार्य आणि योगदान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे हा या प्रदर्शनाचा प्रमुख हेतू होता.

प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये :-

@ दुर्मीळ व ऐतिहासिक छायाचित्रांचे

दर्शन.

@ विविध सामाजिक, सांस्कृतिक,

ऐतिहासिक घटनांच्या छायाचित्रांचे

दस्तऐवजीकरण.

@ पत्रकारितेच्या माध्यमातून

छायाचित्रणाचे महत्त्व अधोरेखित

करणारे फोटो.

‘पत्रकारिता व छायाचित्रणाचा संगम’ याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रत्यक्षदर्शी म्हणतात, पत्रकारिता ही केवळ लिखित शब्दांपुरती मर्यादित नसून छायाचित्रण हे त्याचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. हजार शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, ते एक उत्कृष्ट छायाचित्र व्यक्त करू शकते. उत्कृष्ट छायाचित्र म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर ते एक भावना, कथा आणि वास्तवही प्रभावीपणे मांडते.

याच दृष्टिकोनातून मनोज कटकतलवारे यांनी केलेले उत्कृष्ट छायाचित्रण या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे.

Copyright ©