Home यवतमाळ 9 फेब्रुवारी रोजी यवतमाळतील पत्रकारांचा सत्कार पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याचे आयोजन

9 फेब्रुवारी रोजी यवतमाळतील पत्रकारांचा सत्कार पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याचे आयोजन

65

9 फेब्रुवारी रोजी यवतमाळतील पत्रकारांचा सत्कार पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याचे आयोजन

यवतमाळ- भारतीय लोकशाही भक्कम करण्याकरिता पत्रकारांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा यथोचित सत्कार व सन्मान व्हावा या उदात्त हेतूने येत्या रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी स्थानिक टिळक स्मारक भवन महादेव मंदिर रोड यवतमाळ येथे पत्रकारांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके हे राहणार आहे. याशिवाय जिल्ह्याचे खा. संजय देशमुख, यवतमाळ विधानसभेचे आ.बाळासाहेब मांगुळकर माजी आमदार ख्वाजा बेग, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष भाऊ बोरले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे तसेच विशेष अतिथी म्हणून मा.राहुल काळे, सहाय्यक कामगार आयुक्त अमरावती, तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष डोमाळे, तसेच सरचिटणीस पद्माकर घायवान हे आदी उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून दैनिक पब्लिक पोस्ट संपादक प्रा. अंकुश वाकडे व दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड तर स्वागताध्यक्ष सा.शेतकरी सत्ता चे संपादक विजय डांगे हे राहणार आहेत.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी भास्कर मेहेरे, दै. तरुण भारतचे प्रतिनिधी समीर मगरे, ग्रामीण क्षेत्रातील पत्रकार राजू चव्हाण, आर्णी येथील शांता राठोड, रामेश्वर पुदरवार, डॉ. अरविंद विश्वास, क्रीडा क्षेत्रातील सौ.मनिषा आखरे, लोकदूचे जेष्ठ पत्रकार अशोक गोडंबे तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा, तसेच संगीत क्षेत्रातील आशिष कैथवास, यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता पत्रकार संघाचे संतोष डोमाळे, पद्माकर घायवान, अशोक उमरतकर, विलास कळसकर, राजु ब्राह्मणकर, जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख, सचिव अब्दुल रफिक, विशाल कुमार राऊत, जरार खान, राहुल ढळे, मुदस्सर शेख, रामेश्वर पुदरवार, प्राध्यापक कैलास जाधव, चंद्रमणी कवाडे, प्रदीप मेश्राम, राजू सोनोणे, अनिल चौरे, बुद्धिझम तेलंग, आनंद लक्षणे, रवी जयस्वाल, निखिल गिरी, संदेश तुपसुंदरे, संघपाल खंडेराव, संजय निंदेकर, कैलास भगत, कल्पना मुनेश्वर, नेहा बागडे, निकिता मरसकोल्हे, शांतीलाल गदई, सय्यद आरिफ, राहुल वसाके, प्रवीण राठोड, सचिन पत्रकार, सुखदेव लिलारे, निलेश वाहने, दशरथ मेश्राम, अमोल खोब्रागडे आदी परिश्रम घेत आहेत.

Copyright ©