Home यवतमाळ मंत्री संजय राठोड यांचा दारव्हा येथे नागरी सत्कार

मंत्री संजय राठोड यांचा दारव्हा येथे नागरी सत्कार

97

मंत्री संजय राठोड यांचा दारव्हा येथे नागरी सत्कार

यापुढे जिसका साथ उसी का विकास – संजय राठोड

दारव्हा येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक तसेच महायुतीच्या सर्व पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकत्यांकडून जेसीबी ने पुष्पवृष्टी करत ना. राठोड यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन पाटील होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपचे स्थानिक नेते प्रा. डॉ. अजय दुबे, शिवसेना जिल्हाध्यक्ष

श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, दत्तात्रय राहाणे, शिवसेना तालुकाध्यक्ष मनोज सिंगि, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पवार सर, कृ.उ.बा.स सभापती सुभाष राठोड आणि उपसभापती सुशांत इंगोले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात “वंदे मातरम” गीताने झाली. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील विविध विकासकामांवर भर दिला. त्यांनी

जनतेचा विश्वास कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला आणि जातपातीच्या राजकारणावर टीका करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालून कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

राठोड यांनी जलसंधारण क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. त्यांनी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १००० कोटी रुपयांच्या निधीतून धरणे आणि बंधारे उभारण्याची योजना जाहीर केली, ज्याचा उद्देश टँकरमुक्त महाराष्ट्र घडवणे आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा वाढवण्यावर विशेष भर दिला

असून, शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. युवकांच्या बेरोजगारीच्या समस्येवरही त्यांनी चर्चा केली आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यकत्यांना सोडणार नसल्याचे सांगून त्यांनी आपल्या मंत्रिपदाची जबाबदारी भान ठेवून निभावण्याचे वचन दिले. मंत्री संजय राठोड यांनी जनसेवा, आरोग्य सुविधा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे वचन देत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Copyright ©