Home यवतमाळ ५ वी मास्टर रॉयल कप, राष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी...

५ वी मास्टर रॉयल कप, राष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी यवतमाळच्या विद्यार्थ्यांचे सुयश

94

५ वी मास्टर रॉयल कप, राष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी यवतमाळच्या विद्यार्थ्यांचे सुयश

राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी, यवतमाळ येथील खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन राहिले. दिवसेंदिवस कराटे खेळामध्ये अधिकाधिक प्रगती होत आहे. ५ वी मास्टर रॉयल कप, राष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी, यवतमाळ व नवज्योत प्री. स्कुल अंड लर्निंग सेंटर, बोथगव्हान यवतमाळ येथील २१ खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन दाखऊन यवतमाळची मान उंचावर नेली. तसेच आपल्या प्रशिक्षकासोबत आई-वडिलांचा स्वाभिमान वाढविला.

हि स्पर्धा वर्साटाईल शोतोकान कराटे फाउंडेशन इंडिया यांच्या विद्यमाने घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये यवतमाळ च्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट प्रदर्शन दाखऊन यश संपादन केले.

२१ वर्षे वरील खुल्या वयोगटा मध्ये आशुतोष अढाल याने काता मध्ये सुवर्ण पदक व कुमित्ते मध्ये रौप्य पदक, स्वराज धनरे याने काता मध्ये रौप्य पदक व कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक, दीपक हेमने यांनी काता व कुमित्ते दोन्ही प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.

१४ वर्षे वयोगटा मध्ये आयरिन कारुणिक ने कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये कांस्य पदक, अद्वैत तिरपुडे याने कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये कांस्य पदक प्राप्त केले.

११, १२, व १३ वर्षे वयोगटा मध्ये पूर्वजा हेमने ने कुमित्ते मध्ये कांस्य पदक व काता मध्ये रौप्य पदक, राजवीर राठोड याने काता मध्ये कांस्य पदक, वीर राठोड याने कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये कांस्य पदक, ईश्वरी हुकरे ने कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये कांस्य पदक, लव दुर्गे याने कुमित्ते मध्ये कांस्य पदक व काता मध्ये कांस्य पदक, पार्थ पवार याने कुमित्ते मध्ये कांस्य पदक व काता मध्ये कांस्य पदक, जानव्ही रोकडे ने कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये रौप्य पदक, वंशिका भरबडे ने कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये सुवर्ण पदक, देवांशु येटरे याने काता मध्ये रोप्य पदक प्राप्त केले.

८, ९, १० वर्षे वयोगटा मध्ये नेहाल राठोड कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये सुवर्ण पदक, शौर्य पवार याने कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये कांस्य पदक, धीरज मांगुळकर याने कुमित्ते मध्ये कांस्य पदक व काता मध्ये सुवर्ण पदक, तन्वी राठोड कुमित्ते मध्ये रौप्य पदक व काता मध्ये कांस्य पदक, माहेश्वरी चव्हाण ने कुमित्ते मध्ये कांस्य पदक व काता कांस्य सुवर्ण पदक प्राप्त केले.

हि स्पर्धा दि. २८ व २९ डिसेंबर रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी वेस्ट, मुंबई येथे घेण्यात आली होती, खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय शीहान महावीर चव्हाण, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व प्रशिक्षक कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी, यवतमाळ चे संथापक अध्यक्ष, स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा समिती तांत्रिक निर्देशक सेन्साई सुजित पत्रे व आई-वडिलांना दिले. विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह २६ जानेवारी रोजी नवज्योत प्री. स्कुल अंड लर्निंग सेंटर, बोथगव्हान येथे होणार आहे.

Copyright ©