सागर मुडे पांढरकवडा
सांडपाण्यामुळे ढोकी गावात रोगराईचा उद्रेक .. !
तात्काळ ठोस पाऊल न् उचलल्यास जनतेचा आंदोलनाचा इशारा ..!
पांढरकवडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले ढोकी(वाई) गावाला, दैनंदिन समस्येने मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे . परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे कुठलेही ठोस पाऊल ऊचलतांना दिसुन येत नाही.या संदर्भात गावातील जनतेनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन पण ग्रामपंचायत प्रशासन चिर निद्रेत असल्याचे दिसुन येत आहे. असाच काहीसा प्रकार ढोकी येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये दिसून येत आहे. रामभाऊ राऊत यांच्या घराजवळ असलेल्या , शेजाऱ्याचे सांडपाणी मागील कित्येक महिन्यापासून वर्दळीच्या रस्त्यावर सोडण्यात येत आहे . त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणत रोगराई बळावली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेवक यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कुठलेही ढोस पाऊल ग्रामपंचायत प्रशासन उचलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे यावर तत्काळ कठोर पाऊल न् उचलल्यास गावातील नागरिक ,गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा नरेंद्र राऊत यांनी दिला आहे.
