मंगरूळ
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत साखर कारखान्या जवळ मंगरूळ येथून शेताकडे शेतकरी आपली बैलगाडी घेऊन जात असताना मागून येणारा मिनी ट्रक आयशर हा भरधाव वेगाने आल्याने जबर धडक दिली आयशर ट्रक क्र.MH13 AX 3665 इतकी जबर धडक दिली की यामध्ये विठ्ठल सीताराम खेरे वय अंदाजे 70 सुभाष गावंडे वय 55 याला गंभीर दुखापत झाली व धडकीमुळे दोन्ही बैल पायातून निकामी झाले तर गाडी दूर फेकल्या गेली यामुळे शेतकऱ्याची मोठया प्रमाणात हानी झाली व दोन्ही गंभीर व्यक्तीला उपचारासाठी यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलीस कर्मचारी घटना ठिकाणी पोचले नव्हते.



