Home यवतमाळ प्रभारी ठाणेदारांच्या धडक कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले

प्रभारी ठाणेदारांच्या धडक कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले

8

प्रभारी ठाणेदारांच्या धडक कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले

पोलीस स्टेशन वडगाव जंगल हद्दीमध्ये होळी सणाच्या दरम्यान कोणतेहि अनुचित प्रकार घडू नये याकरिता वडगाव जंगल पो.स्ते चा अतिरिक्त प्रभार लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षिका दीपमाला भेंडे यांना देण्यात आला होता. दिनांक ०६/०३/२०२३ रोजी पोलीस निरीक्षिका दीपमला भेंडे ह्या गस्त करीत असताना वरझडी ते वरुड या रोडवर ट्रॅक्टर क्रमांक एम.एच 29 बी.सी 2921 मध्ये वाळू तस्करी करणाऱ्या वाहन चालक नामे विजय श्रीराम कडाके राहणार अकोला बाजार यास पकडून त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम.एच 29 बी.सी 29 21 व ट्रॉली क्रमांक एम एच 29 ए डी 8750 मध्ये एक ब्रास रेती अढळून आली ट्रॅक्टर ताब्यात घेऊन एकूण ३५३००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून. आरोपी विरुद्ध कलम 379 भारतीय दंड विधान सह कलम 48 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करून न्यायालयाचे आदेशाने न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संपतराव भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वडगाव जंगल ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भास्कर दस्ते ,पोलीस कॉन्स्टेबल जयवंत ब्राह्मणकर पो. शि इम्रान खान यांनी केली आहे

Copyright ©