दारव्हा रोड वरिल कोल्ड कॅफे मध्ये मुलीसोबत छेडखाणी
मुलीच्या काकावर चाकू व रॉड ने हल्ला
शहरातील मानोरा चौक परिसरात असलेल्या कॅफे मध्ये २१ वर्षीय मुलीची छेडखाणी करणाऱ्या आरोपीस जाब विचारणाऱ्या काकाला शिविगाळ करत चाकूहल्ला केला तसेच रॉडने मारहाण करून जखमी केले. या बाबत प्राप्त माहितीनुसार दिग्रस शहरातील मानोरा चौक परिसरातील कॅफे मध्ये आरोपी अखिलेश महेश चव्हाण वय-२२ वर्ष रा. शास्त्रीनगर याने फिर्यादीच्या पुतणी सोबत छेडखणी करून युवतीला दुचाकीवर घेऊन जात असताना खंडाई रोड जवळ फिर्यादीने आरोपीस हटकले असता आरोपी अखिलेश चव्हाण याने फिर्यादिस शिविगाळ करून चाकू हल्ला केला. यात फिर्यादीच्या हातावर चाकूचा वार करुन तसेच आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर दिग्रस येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी फिर्यादी याने दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अखिलेश महेश चव्हाण वय-२२ वर्ष रा. शास्त्रीनगर दिग्रस याच्यावर कलम ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



