बाभूळगाव ता. प्र.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी पर्यत कोपरा जानकर येथे श्री संत गजानन महाराज संस्थान व गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवा निमित्ताने दररोज सकाळी 5 ते7 काकड आरती,7 ते 8 पारायण, दुपारी 12 ते 5 पर्यत ह. भ. प. भागवताचार्य लक्ष्मण महाराज टोनचर रा. येवता जि. वाशीम याच्या अमृतवणीतून भागवत कथा व मृदंग वादक ज्ञानेश्वर ढोले कापरा, हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर डेहनकर ,टाळकरी प्रभाकर नवाडे, भगवान कांबळे, दिगांबर आदमने,चंद्रकांत नेरकर,गजानन नेरकर यांचा साथीला राहणार आहे. श्रीमद भागवत कथा सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ रात्री 7 ते 10 ,दिगांबर गाडगे महाराज कळंब, रमेश खेरडे महाराक चांदुर रेल्वे रामदन महाराज गिमोना, सुदाम महाराज दाभा,गौरव महाराज ठाकरे आंळदीकर ,पद्माकर ठाकरे महाराज बाभूळगाव गुरुदेव सेवा मंडळ बाभूळगाव यांचे दररोज रात्री 8 ते 10 किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.ता.13 ला श्रीची अभिषेक व महाआरती सकाळी 9.30 ते 2 वाजता पालखी सोहळा दुपारी 2.30 ते 4 वाजता काल्याचे कीर्तन रात्री 5 ते 9 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व तालुक्यातील भक्त मंडळींनी या श्रीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थान कोपरा व गावकऱ्यांनी केली आहे.
