क्रॉस कंट्री स्पर्धेत विदर्भातील ६५० धावपटूचा सहभाग
श्री समर्थ क्रीडा मंडळ आनंदवन परिवार आणि बीपीएड कॉलेज यवतमाळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रॉस कंट्री स्पर्धेत विदर्भातील ६५० पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला.
यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे यांनी दहा किलोमीटर दौड स्पर्धेत धावून धावपटूंना प्रोत्साहन दिले.
दिवंगत योगाचार्य व अध्यात्म गुरु बापू सहस्रबुद्धे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नेहरू स्टेडियम वरून सुरू झालेल्या या स्पर्धेला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. अतिशय चुरसपूर्ण झालेल्या या स्पर्धेत दहा किलोमीटर गटात आवेश चव्हाण, पाच किलोमीटर मुलींच्या गटात लीना मेश्राम तर तीन किलोमीटर मुलांच्या गटात प्रज्वल शेटे यांनी प्रथम स्थान पटकावले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ॲथलेटिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुवर्णसिंग प्रेमी चंदिगड यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून ललितकुमार व-हाडे, अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनेश्वर, नाना देशपांडे,, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक व एकवीध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अमोल देशमुख, जिल्हा अथलेटिक संघटनेचे सचिव राजु जॉन, क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष सतीश फाठक, डॉ. उल्हास नंदुरकर, डॉ. साहेबराव साखरे, प्राचार्य उदय नावलेकर, रामजी वशिष्ठ, प्राचार्य उमाकांत पिंगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. आभार प्रदर्शन मनोज पेशवे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन संजय दंडे यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, क्रीडा भारती, आनंदवन परिवार, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे
दहा किलोमीटर दौड:
प्रथम आवेश चव्हाण, द्वितीय संजय पटेल धारणी, तृतीय प्रवीण धुर्वे
प्रोत्साहन पर बक्षीस:
अजय टेकाम, संकेत सिंगनधुपे, पियुष भगत नागपूर, संजय म्हात्रे, प्रणय टीचुकले.
पाच किलोमीटर मुली:
प्रथम लीना मेश्राम, द्वितीय अवंतिका वासनिक, तृतीय गुंजन खिची.
प्रोत्साहनपर बक्षीस:
प्रीती धाकरगे, कीर्ती देऊळकर, रेश्मा जुनघरे, गौरी चिंताडे, वैष्णवी पंधरे, चारू पांडे, माया फातिमा.
तीन किलोमीटर मुले:
प्रथम उज्वल शेटे, द्वितीय चेतन पुरके, तृतीय सावेश चव्हाण, प्रोत्साहन पर बक्षिसे:
चंदन पुरके, आर्यन ढोरे, आशिष चौधरी, पवन बोटरे प्रितम येरगुडे. विशेष प्रोत्साहन पर बक्षीस ओजस व-हाडे. विजेत्यांना ३१,००० रुपयांची रोख बक्षीसे तसेच श्रीराम स्पोर्टस् यांचे वतीने स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.
