Home Breaking News रुग्नांची समस्यावर शासनाचे दुर्लक्ष

रुग्नांची समस्यावर शासनाचे दुर्लक्ष

12

रुग्नांची समस्यावर शासनाचे दुर्लक्ष

यवतमाळ येथिल श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ याची चर्चा थांबता थांबेना,अजूनही या ठिकाणी विविध घटना घडू लागल्या व या घटनानमुळे महा व रुग्णालयातील डॉक्टर व सेवेत असणाऱ्या प्रत्येकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येत आहे पन रुग्नांचे काय?असा मोठा प्रस्न भेडसावत असतानाही इतर मात्र गप्प का? डॉक्टर व कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या सोई सुविधानचा पुरेपुर गैर फायदा घेत रुग्नांसोबत जनु काही अत्याचार होउ लागले आहे.डॉक्टरांची रुग्नांसोबत असभ्य वर्तनचुकीचे चित्र सतत पहावयास मिळते रुग्णालयात रुग्नांना औषधि नाहीच्या बरोबर मिळत आहे. रुग्नालयाचे औषधालय 24 तास सुरु असन्या ऐवजी सकाळी 10 वाजता सूरु होऊन सायंकाळी 5 वाजता बंद केल्या जाते रुग्नांना सुट्टी मात्र सकाळी 6 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता दिल्या जाते सकाळी सुट्टी झालेल्या रुग्नांना 10 वाजे पर्यंत औषधि घेण्यासाठी थांबावे लागते परंतु 5 वाजता नंतर सुट्टी झालेल्या रुग्णाला स्व खर्चातुन औषधि घ्याव्या लागत आहे.रुग्नांना रक्ताच्या चाचन्या या सुध्दा खाजगी केन्द्रामधूनच करुण आनाव्या लागत आहे.अनेक डॉक्टर वेतन शासनाकडून घेऊन रुग्णालय स्वतः चे चालवतात शिकाऊ डॉक्टरांच्या चुकांमुळे अनेक रुग्ण दगावत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे, एकीकडे महिला बाल कल्याण योजना राबविल्या जात आहे तर दुसरिकले शासकीय महा तथा रुग्णालयात यवतमाळ या ठिकाणी प्रसूति दरम्यान अनेक माता मृत्यु मुखी पडल्याचे ऐकवायास मिळत आहे.रुग्नालयातअधिकारी

 

अनेक कामें होत असल्याचा उहा पोह करीत आहे,मात्र सोयी सुविधा नाही,मग शासनाचा येणारा निधी जातो कुठे! या रुग्णालयाला हि राजकीय कीड लागली असल्याने सर्व सामान्यांच्या जिवारी बेतत आहे रुग्नालयाच्या वार्ड मधील संडास बाथरूमच्या दारातून माणसाच्या चेहरा सोडून सर्व काही दिसते आणि घान इतकी की दुर्गंधी पसरलेली कि आपण जाणे ही शक्य नाही,इतकी की श्वास घेण्या ऐवजी श्वास न घेता त्या परिसरातून जावे लागते,या बाबत संबंधितांना विचारले असता ते म्हणतात की 20 रूपयात आनखि काय द्यायचे अशी ही उत्तर संबंधितांना कडून दिल्या जाते,अश्या दैनीय अवस्थेत रुग्णाला उपचार घ्यावे लागत आहे.रुग्नास खाजगी रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयात जवळपास सारखाच खर्च रुग्णाना करावा लागत आहे.शासकीय रुग्णालयात रुग्नांच्या प्रत्येक क्षनी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे

आणि लोकप्रतिनिधी या समस्या कडे दुकनही पहात नाही हि शोकांतिका आहे.येथील पालकमत्र्यांनी व आमदारांनी जणू काही तुळशी पत्रच ठेवले, येथील शासकीय रुग्णालयात वाढत्या मनमानी कारभारास कोण लगाम लावणार? सर्वसामान्यांची कोण दखल घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

Copyright ©