वसुंधरा फाउंडेशनच्या वतिने वृक्षारोपण व रोपांचे वाण वाटुन संक्रांत सण साजरा.
यवतमाळ प्रतिनिधी दि.१५ जानेवारी -: हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खूप महत्त्व मानले जाते. आज दि.१५ जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केल्या जाते. पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. म्हणूनच या दिवशी पिता-पुत्रांची भेट होते. यावेळी १५ जानेवारी २०२३ रोजी म्हणजेच आज मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. हा सण दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच खरमास संपतो. यानंतर पुन्हा एकदा शुभ आणि मंगल कार्य सुरू होतात.
या मकर संक्रांति सणानिमित्त वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने वाघाडी नदी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला. यावेळी वसुंधरा फाउंडेशनच्या नावाला साजेशे असे वसुंधरेचे संगोपन करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.बीज म्हणजेच वाण आणि प्लास्टिकच्या वस्तू टाळून पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धक बियाणे वाण स्वरूप वाटप करण्यात आल्या. एकमेकांना शुभेच्छा देऊन आणि श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. तसेच या उपक्रमात विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते यांना फुलझाडे तसेच फळांच्या,भाज्यांचे बीज वाटप करून संक्रांत सण साजरा करण्यात आला.यावेळी वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वर्षा पडवे ,सचिव प्रिया गायनर,योगिता मासाळ,करुणा धनेवार ,स्मिता ढेगले,नेहा शर्मा,माधुरी कोटेवार तसेच कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र फाळके, राजुभाऊ निवल, आश्विन सवालाखे ,भूषण ढोबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
