Home यवतमाळ विविध मागण्यासाठी नागपूर अधिवेशनावर महाआंदोलन करणार

विविध मागण्यासाठी नागपूर अधिवेशनावर महाआंदोलन करणार

12

विविध मागण्यासाठी नागपूर अधिवेशनावर महाआंदोलन करणार

प्रमोद लोंढे माजी जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना
—————————————-
दारव्हा अनुसूचित जाती चा अ ब क ड वर्गीकरण करण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा अनेक मागण्या साठी लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे लाखोंच्या संख्येने अधिवेशनावर महाआंदोलन करणार आहे.या महाअधिवेशनाची लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात वर्धा येथील सेवाग्राम महात्मा गांधी सेवा आश्रम येथुन दिनांक 26 डिसेंबर पासून ते नागपूर पर्यंत पदयात्रा सुरुवात होईल 29 डिसेंबर रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्रातील मातंग समाजातील नेतेगण उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शाखाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या महा आंदोलनात उपस्थित राहुन आपल्या मातंग समाजाच्या हक्काच्या मागण्या मंजूर करुन घेऊया मि निघालोय तुम्ही निघा अशी माहिती.लहुजी शक्ती सेनेचे यवतमाळ जिल्हा माजी युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद लोंढे यांनी माहीती दिली. यावेळी दिग्रस दारव्हा नेर आर्णि पुसद उमरखेड तथा यवतमाळ जिल्ह्यातील हजारो मातंग समाजातील कार्यकर्ते व महीला युवक विविध सामाजिक संघटना तसेच लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी या महा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रमोद लोंढे माजी जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना यवतमाळ जिल्हा यांनी केले.

Copyright ©