यवतमाळच्या नाट्यगृह उद्यानाची श्रमदानातून स्वच्छता !
नववर्षाच्या प्रारंभात नाट्यगृहाचे लोकार्पण होणार…
यवतमाळ (प्रति) शनिवार श्रमदानाचा या उपक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी सुरु केलेली विशेष स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत असुन यवतमाळचे सांस्कृतिक वैभव म्हणुन लोकार्पणासाठी सज्ज होत असलेल्या नाट्यगृह परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता केली.
स्थानिक गार्डन रोड परिसरातील शिवतिर्थ परिसरात साकारलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम जवळपास पुर्ण झाले आहे. या वातानुकूलित इमारतीची आंतरिक आसनव्यवस्था विद्यूतव्यवस्था आणि इतर अनुषंगिक कामे जलदगतीने सुरु असुन नविन वर्षाच्या प्रारंभपर्वात कला व नाट्यप्रेमींच्या आस्थेचे आकर्षण केंद्र असणाऱ्या या अद्यावत नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती मा. मुख्याधिकारी यांनी दिली आहे.
आज मुख्याधिकाऱ्यांनी निर्देशीत केल्यानुसार श्रमदान चमुतील कर्मचाऱ्यांनी नाट्यगृह परिसरातील शिवस्मारक उद्यानात अनावश्यक वाढलेली झाडेझुडपे-गाजरगवत तणकट कापणी करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. एकीकडे दर शनिवारी एकत्रितपणे श्रमदान करणे हा पायंडा प्रभावीपणे अंमलात आणला जात असुन दुसरीकडे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम जोरकसपणे सुरु आहे.
