Home Breaking News भाजपा पदाधिकारी चित्रा वाघ यांचा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेध

भाजपा पदाधिकारी चित्रा वाघ यांचा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेध

11

भाजपा पदाधिकारी चित्रा वाघ यांचा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेध

येथील पत्रकार परिषदेत पत्रकाराचा अवमान करीत उद्धभाषेचा उपयोग केल्याने भाजपा पदाधिकारी चित्रा वाघ यांचा स्व.पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले. यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, व कुणीही आम्हाला प्रश्न विचारायचे नाही असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये चांगलीच चर्चा वादात रुपांतर झाली. या

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारताच चित्रा वाघ यांनी विदर्भ दौरा सुरु केला आहे. आज त्यांनी यवतमाळ येथे भेट दिली. यावेळी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने गेल्या १०० दिवसांत महिलांच्या सन्मानासाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याच अनुषंगाने पत्रकारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात केलेले आरोप मागे घेऊन आपणही त्यांना क्लीनचिट दिली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा आपली संजय राठोड यांच्याविरोधात सुरू असलेली लढाई त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राठोड यांना मंत्रीमंडळात घेतले.
त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आरोप करून त्यांचे राजकीय जीवन उद्धवस्त केले नाही काय, असा प्रश्न टी ओ.अब्राहम इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारताच वाघ यांनी, तुम्ही संजय राठोड यांचे पीआरओ असल्यासारखे बोलू नका. अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परीषदेत पुन्हा बोलवू नका असेही सांगीतले. वाद वाढल्याने बहुतांश पत्रकारांना वाघ यांनी प्रश्न विचारू दिले नाही. त्यामुळे पत्रकार आणि वाघ यांच्यात वादाची ठिणगी उडाली. या वादानंतर सर्व पत्रकार निषेध नोंदवून पत्रपरिषदे मधून बाहेर पडले या पत्रकार परीषदेला आमदार अशोक उईके, निलय नाईक, संजीवरेड्डी बोतकुरवार, नितीन भुतडा, आरती फुफाटे, रेखा कोठेकर, सुरज गुप्ता, राजु पडगीलवार, शंतनु शेटे उपस्थित होते.
हि घटना अत्यंत निंदनीय आहे
पत्रकारांन विषयी केलेले वक्तव्य निदनिय व निषेधार्थ असुन या घटनेचा स्व.पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे, वाघ नी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी असे ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके, पवन धोत्रे, गोकुल खडसे,अड. विजय गुप्ता, निलेश पवार,राजेश भागानगरकर, दत्तु कुशावार, सचिन चौधरी, यांनी केली आहे.

Copyright ©