Home यवतमाळ निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची 10 नोव्हेंबरला जाहीर सहविचार सभा.

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची 10 नोव्हेंबरला जाहीर सहविचार सभा.

16

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची
10 नोव्हेंबरला जाहीर सहविचार सभा.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाजलेला व मंजुरीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत बुडीत क्षेत्रातील लोकांची मते नव्याने जाणून घेण्याकरिता
निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने 10 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता सावळी सदोबा येथील साई मंगल कार्यालयात जाहीर सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप व प्रसिद्धी प्रमुख मुबारक तंवर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
मागील काही दिवसापासून या प्रकल्पाचे सर्व अडथळे दूर झाले, बुडीत क्षेत्रातील शेतीच्या खरेदीची विक्रीचे व्यवहार बंद झाल्याचे शासनाचे पत्र निघाले आता या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे अशा विविध प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातून सतत झळकत असल्याने बुडीत क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर वर्गात भीतीचे व संशयाचे वातावरण या प्रकल्पाबाबत तयार झाले आहे या सर्व प्रकारच्या चर्चेबद्दल व भविष्यातील या प्रकल्पाबद्दल निश्चित कोणती भूमिका घ्यावी ? काय करावे ? यासाठी बुडीत क्षेत्रातील सर्व लोकांची मते जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील या प्रकल्पाबद्दलचा लढा कसा लढायचा याबद्दलची रणनीती ठरविण्यासाठी ही जाहीर सहविचार सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप व प्रसिद्ध प्रमुख मुबारक तंवर यांनी दिली असून बुडीत क्षेत्रातील जनतेंनी या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या प्रकल्याबाबत आप आपली मते मांडल्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Copyright ©