ऑनलाईन फसवणुकीतील एकुण ४ तक्रारदारांचे पैसे परत
यवतमाळ
दिनांक-१९/१०/२०२२, २०/१०/२०२२, २६/१०/२०२२ व २९/१०/२०२२ रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वास्तव्यास तक्रारदार यांना वेगवेगळे मोबाईल क्रं. ८९६२९४८८२६. ८७२४८५८५५२. यावरुन फसवणुकीचे कॉल आले होते. कॉलवरील व्यक्तीने संभाषण करताना बोलण्याचे ओघात ३ तक्रारदार यांना लिंक पाठवून त्यांचे मोबाईलमध्ये Anydesk =pplication डाउनलोड करुन तक्रारदार यांचे मोबाईलमध्ये एक्सेस करुन त्याद्वारे बँक खात्यामधून पैसे वळते केल्याने ३ तक्रारदार यांचेसोबत फसवणुक झाली. तसेच एक तक्रारदार याने शिर्डी येथे हॉटेल बुकींग करिता गुगलवर भक्त निवास संपर्क क्रमाक सर्च केला तेव्हा त्यास मो. क्रंमाक ७००२३५७८२४ हा दिसल्याने सदर क्रमाकावर कॉल केला असता समोरील बोलत असलेला व्यक्ती हा हॉटेल बुकींग करणाराच आहे असे समजुन हॉटेल बुकीगकरिता पैसे जमा केले. काहीवेळाने तक्रारदार याची फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्याने तक्रार दाखल केली. याप्रमाणे ४ तकादार यांची एकुण १ लाख ५६ हजार रुपयाची ऑनलाईन फसवणुक झालेली होती. सायबर सेल, यवतमाळ यांनी तात्काळ कार्यवाही करित तक्कादार याचसोबत फसवणुक होवुन ज्या ठिकाणी पैसे वळते झाले. त्याठिकाणी तात्काळ ईमेलद्वारे संपर्क केल्याने फसवणूक झालेल्या रकमेपैकी ५८,००० रुपये परत आणन्याकरिता यश आले आहे. मो. क्रमाक ७००२३५७८२४ हा Fraud असल्याने सदर क्रं. Google वरुन Remove करण्याकरिता सुध्दा कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
सदरची कार्यवाही डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक, यवतमाळ. डॉ. के. ए. धरणे अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास मुंढे, पोलीस शिपाई अजय निबोळकर ब.नं. ९८०, मपोशी रोशनी जोगळेकर ब.नं. १९३०, प्रगती कांबळे व.नं. १७७७, पोशी अभिनव ब.नं. ११६१ सर्व सायबर सेल यवतमाळ यांनी पार पाडली.
याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याला लॉटरी, जॉब ऑफर, ईलेक्ट्रोक बिल, क्रेडीट कार्ड. ऑनलाईन लोन किंवा ५ जी अपडेट इत्यादीबाबत मोबाईल नंबरवरून कॉल आल्यास अशा प्रकारच्या कोणत्याही अनोळखी कॉलला प्रतिसाद देवू नका किंवा कोणत्याही लिंकवर खात्री झाल्याशिवाय क्लीक करु नये. त्याचप्रमाणे Google वर Costumer care contact number सर्च करताना खात्री केल्याशिवाय सर्च केलेल्या मोबाईल क्रमाकावर संपर्क करु नका. दुदैवाने आपल्यासोबत सायबर क्राईमचा प्रकार घडल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर जावुन सायबर क्राईमबाबत ऑनलाईन तक्रार नोंदविता येईल हे दोन्ही पर्याय शक्य नसल्यास सायबर सेल, यवतमाळ व संबंधित पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
