एक पणती हुतात्मा चरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान व शिवतेज चा उपक्रम
भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणार्या हुतात्म्यांना व अनाम वीरांना अभिवादन करण्यासाठी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान व शिवतेज संस्थेसह अनेक सेवाभावी संस्थांनी एकत्रीत येऊन ५०० पणत्यांची आरास लावली. “एक पणती,हुतात्मा चरणी” या उपक्रमाचे हे सलग सोळावे वर्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय…!! भारत माता की जय…!! जय भवानी… जय शिवराय…!! वंदेमातरम्… आदी घोषणांनी परीसर दणाणून गेला.
शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान चे अतुल मेहेत्रे, शुभम् गावंडे,संदीप कापसे,सार्थक गरबळे, रियांश मेहेत्रे, कौस्तुभ कापसे, कैवल्य कापसे, श्राव्या मेहेत्रे,शिवतेज चे संतोष झाडे,सुशील घोलप,वसंता खोडके, किसन सहदेव,पांडूरंग दारोळकर, सुरेंद्र राठोड, ऋषिकेश हिरास, शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे प्रणीत मोरे,साहिल जयस्वाल, यादव गावंडे,यादव पवार, संदीप झाडे, स्वप्नील दुधे,प्रज्योत अरगडे,केतन रत्नपारखी,विनायक दुधे,प्रशांत गौरकर यांचे सह शहरातील सर्वच पक्षीय पदाधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
