Home Breaking News अज्ञात टेम्पोची दुचाकीला समोरासमोर धडक

अज्ञात टेम्पोची दुचाकीला समोरासमोर धडक

11

अज्ञात टेम्पोची दुचाकीला समोरासमोर धडक

कॉलनी जवळ अपघात ; २ गंभीर जखमी

दिग्रस शहरापासून २ की.मि अंतरावरील कॉलनी जवळील पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात टेम्पोने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ७:३० वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की आर्णी वरून दुचाकीने दिग्रस कडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात टेम्पो ने जबर धडक दिल्याने गजानन किसन गायकवाड वय -४५ व नारायण राऊत दोघे रा.चिंचोली क्र. २ गंभीर जखमी झाले. त्यांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघातातील दुचाकी ताब्यात घेतली. पोलिसांकडून अज्ञात टेम्पोचा शोध सुरू आहे.

Copyright ©