Home यवतमाळ औंरंगाबाद येथे कलेचा आविष्कार.सुनिल चव्हाण यांना राष्ट्रीय पुरस्कार

औंरंगाबाद येथे कलेचा आविष्कार.सुनिल चव्हाण यांना राष्ट्रीय पुरस्कार

36

औंरंगाबाद येथे कलेचा आविष्कार.सुनिल चव्हाण यांना राष्ट्रीय पुरस्कार

शब्द गंध प्रकाशन आणि ग्रंथ मित्र युवा मंडळ औंरंगाबाद.यांचे संयुक्त विद्यमाने दि.09.10.2022 ला भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्य वीरांचा विविध राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा मौलाना अब्दुल आझाद रिसर्च सेंटर औंरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाचे उद्घघाटन सिने अभिनेत्री रुपाली पवार, ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट फेम, ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री अरुण घोडेराव व श्री सुमित राठोड हे होते.या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव ता.आर्णी जी.यवतमाळ यांना मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ शिल्ड व प्रमाणपत्र देऊन संगीत गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्याचे सूत्रसंचालन किरण साळुंखे यांनी केले तर आयोजन लखन काशीकर व संदीप त्रिभुवन यांनी केले या वेळी बरीच रसिक मंडळी हजर होती

Copyright ©