उपसरपंच पदि अभिजित राठोड याची निवड
तिवसा ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी दि 10.ऑक्टोंबर.2022 रोजी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायत मधील एकूण 11 सदस्य व सरपंच असे मिळून 12 सदस्य मोठी ग्रामपंचायत असून येथील झालेल्या निवड नुकी मध्ये 12 पैकी अभिजित रंजित राठोड (नाईक ) हे 8/4 असे मतांनी विजयी झाले. अभिजित विकास कामात,समाज सेवेत तत्पर असल्याने त्यांच्या निवडीने सर्वत्र समाधान वेक्त करण्यात येत आहे
गावातील सर्व जनतेचं आणि राजेशभाऊ राठोड यांचे त्यांनी आभार मानले व सरपंच नरेश वामनराव राठोड यांनी गावाचा विकासासाठी तन मन धनाने गावाच्या विकास कामास प्रथम प्राधान्य देऊ आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन दिले, या वेळी सरपंच नरेश वामनराव राठोड उपसरपंच अभिजित रणजित राठोड
सदस्य अरुणराव कुमरे, श्रीमती संगीता आनंद फुफरे, उमेश प्रेमसिंग राठोड, श्रीमती कांता रमेश राठोड , श्रीमती शुभांगी चेतन चव्हाण, कू.जोत्सना उकांडराव राठोड, यांच्या उपस्थितीत हि निवडणुक घेण्यात आली.
