सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभु व श्रीगोविंदप्रभु अवतरणदिन व्याख्यानमाला उत्साहात संपन्न
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभु अवतरणदिन ते श्रीगोविंदप्रभु अवतरणदिनानिमित्त महानुभाव सेवा संघ अंतर्गत आयोजन समिती व्दारा अकरा दिवशीय व्याख्यानमाला कै.रावसाहेब गं.म.ठवरे स्मृती प्रार्थना सभागृह, श्रीगोविंदप्रभुनगर, राजापेठ बसस्टॉप, हुडकेश्वर रोड,नागपूर येथे संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे उद्घाटन महंत श्री वाकीकरबाबा देवबर्डी यांच्या अध्यक्षतेत व त.साधाईसा कपाटे उर्फ सुश्री केशरताई मेश्राम यांच्या शुभहस्ते दिनांक २९ ऑगस्ट रोजी झाले होते तर समारोप दि.०८ सप्टेंबर रोजी झाला. समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानी कविश्वराचार्य महंत श्री माहूरकरबाबा, महंत बांधकरबाबा, महंत विश्वनाथबाबा, त.साधाईसा कपाटे, त.डॉ. चंदाईसा पैठणकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी
बी.जी.जाधव लिखित सर्वज्ञ आणि त्यांचे तत्वज्ञान आणि डॉ. प्रवीण बनसोड लिखित भारतीय स्वातंत्र्याचे उदगाते सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिनांक ३०/८/२०२२ ते ७/९/२०२२ नऊ दिवस पंथातील पंथीयेतर सुप्रसिद्ध वक्ते, साहित्यिकांची वेगवेगळ्या विषयांवर अप्रतिम अशी व्याख्याने संपन्न झाली. ही व्याख्यानमाला म्हणजे महानुभाव तसेच महानुभावीयेतर मंडळीच्या ज्ञान कक्षा सशक्त करणारी ठरली आहे. या व्याख्यानमालेचे हे ८ वे वर्ष आहे तसेच सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींची या वर्षी अष्टशताब्दी आहे
या दृष्टीने ही व्याख्यानमाला अत्यंत महत्त्वाची ठरली. समारोपीय सोहळ्याचे सुत्रसंचालन महंत खंदारकरबाबा प्रास्ताविक राजकुमार शेंडे, आभार ई.श्री. चक्रपाणीदादा कविश्वर यांनी मानले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अनेक सन्माननीय व्यक्तिमत्त्वांचा सहयोग लाभला त्यात धनराज रंगारी, उन्मेष गेडाम, अशोकराव पवार, आनंदराव गजभिये,साजनकुमार शेंडे, गिरीष चौरे,प्रा. भारतभुषण शास्त्री, कांता शेंडे, सुनिता पवार,नलु इंगोले, विद्या पवार, गायत्री फुके,प्रीती रंगारी,पोर्णिमा ठवरे या सर्व आणि इतरही अनेक मंडळींचे व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी अनमोल योगदान लाभले.
