Home यवतमाळ व्होटर हेल्पलाईनद्वारे मतदार ओळखपत्र लिंक करा आधारकार्डसोबत

व्होटर हेल्पलाईनद्वारे मतदार ओळखपत्र लिंक करा आधारकार्डसोबत

12

व्होटर हेल्पलाईनद्वारे मतदार ओळखपत्र लिंक करा आधारकार्डसोबत

उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 सप्टेंबर – जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार निवडणूक ओळखपत्र हे आधारकार्ड सोबत जोडणे बाबतची व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. तरी सर्व मतदारांनी आपले स्वत:चे मतदार निवडणूक ओळखपत्र हे आधारकार्ड सोबत जोडावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले आहे.

मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर व्होटर हेल्पलाईन अप्लीकेशन ह्या नावाचे अप्लीकेशन डाऊनलोड करावे. यामधील व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लीक करुन मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड क्रमांक जोडणे फॉर्म 6-बी यावर क्लिक केल्यानंतर मतदाराने आपला मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यावर ओटीपी प्राप्त होईल. तो व्हेरिफाय करुन मतदारांनी आपला मतदान ओळखपत्र प्रविष्ट करुन त्याला फेच केल्यानंतर मतदार ओळखपत्रा करीता असलेला तपशील दिसेल. तपशील तपासून पहा, त्यानंतर प्रोसिड करुन आपला आधार नंबर प्रविष्ट करा त्यानंतर डन करा आणि कन्फर्म करा. तदनंतर मतदाराला आपला क्रमांक मतदार ओळखपत्रासोबत लिंक झाल्याचा मेसेज येईल.

त्याशिवाय आयोगाकडून नेमलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ हे सुध्दा प्रत्येक मतदारांचे घरोघरी आधारकार्ड प्रत्यक्ष मतदारांचे भेट देवून मतदार ओळखपत्र सोबत आधारकार्ड लिंक करण्यात येत आहे, त्यांना योग्य ते सहकार्य करून आपले मतदान ओळखपत्र हे आधारकार्ड सोबत लिंक करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

Copyright ©