Home यवतमाळ शिक्षकदिनानिमित्त विविध साहित्य देऊन शिकांचा सन्मान

शिक्षकदिनानिमित्त विविध साहित्य देऊन शिकांचा सन्मान

21

शिक्षकदिनानिमित्त विविध साहित्य देऊन शिकांचा सन्मान

लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक इंग्लिश मिडीयम स्कूल रुई वाई येथे शिक्षकांना पेन,चॉकलेट, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शिक्षक दिन साजरा.
लेट अल्ताफ आली काझी प्राथमिक इंग्लिश मिडीयम स्कूल रुई वाई येथे 5 सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस निमित्त भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री जावेद अली काझी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शिक्षिका सानिया सैयद ,सहाय्यक शिक्षक नितेश सर स्कूल कर्मचारी संध्या ताई हो होत्या.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करण्यात आले.त्या नंतर स्वागत समारंभ घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत मृणाली ढेकाळे हिने केले,तर सानिया सैयद म्याम यांचे स्वागत स्वरा लोणकर ने केले,कल्याणी करपते मॅडम यांचे स्वागत अशमिरा शेख ने केले तर संध्या ताई यांचे स्वागत तेजस जूनघरे याने केले .त्या नंतर सहाय्यक शिक्षिका सानिया सैयद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सावित्रीबाई फुले यांचे मुलीच्या शिक्षणा बद्दल खूप महान कार्य,योगदान आहे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्या नंतर नितेश सर यांनी दोन शब्द व्येक्त केले .सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषण शाळेचे मुख्याध्यापक श्री जावेद अली काझी सर यांनी शिक्षण आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्या बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले सावित्रीबाई फुले यांनी पारतंत्र्याच्या काळात जे शिव्या,दगड, गोटे,शिक्षणासाठी खाल्ले प्रसंगी त्यांनी खूप यातना सहन करून मुलींसाठी नेहमी झटत राहिल्या.पूर्वीच्या काळी चूल आणि मूल हेच स्त्री चे कार्य मानल्या जाई तिला शिक्षणाची उजगिरी नव्हती परंतु सावित्रीबाई इथेच न थांबता त्यांनी अध्यापन कार्य अविरत पने सुरू ठेवले यामध्ये त्यांना मोलाची साथ त्यांचं पतीची महात्मा ज्योतिबा फुले यांची मिळाली म्हणून हे शक्य झाले .समोर काझी यांनी मुलांना उद्देशून म्हटले कोण कोणाला शिक्षक व्हायचे आहे तर सर्व प्रथम त्यांनी सावित्रीबाई फुले यांना वाचावे लागेल त्यांचा आदर्श समोर ठेवून मेहनत आणि अभास करायला पाहिजे.त्यानंतर शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांच्या शाळेचे अध्यक्ष/ मुख्याध्यापक जावेद अली काझी सर यांनी सर्व प्रथम सहाय्यक शिक्षिका कल्याणी करपते यांचे पेन ,चॉकलेट,आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्या नंतर सहाय्यक शिक्षिका सानिया सैयद यांना पेन ,चॉकलेट, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला,त्या नंतर नितेश डोकडे सर यांचा पेन ,चॉकलेट,पुष्पगुच्छ देवून सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी राबणाऱ्या मेहनत करणाऱ्या विद्यार्थांना घडवणाऱ्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षक दिनी सन्मान म्हणजेच हेच खरी शिक्षकांना शिक्षक दिनी शुभेच्छा .शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी ग्रीटिंग,चॉकलेट,पेन आणि भेट वस्तू म्हणून दिल्या त्या मध्ये मृणाली ढेकाळे, निकुंज कडूकार स्वरा लोणकर, अंशरा शेक तसेच अनेक विद्यार्थ्यांनी भेट वस्तू दिल्या .सूत्र संचालन.सहाय्यक शिक्षिका कल्याणी करपते यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जावेद अली काझी सर, नितेश सर,सानिया सैयद,मयुरी रेनापुरकर,संद्या ताई यांनी मेहनत घेतली.

Copyright ©