Home यवतमाळ पर्यावरण पूरक उत्सवाची गरज पर्यावरणपूरक व सर्परक्षण गणेशोत्सव MH29 हेलपिंग हँड चा...

पर्यावरण पूरक उत्सवाची गरज पर्यावरणपूरक व सर्परक्षण गणेशोत्सव MH29 हेलपिंग हँड चा उपक्रम

28

पर्यावरण पूरक उत्सवाची गरज पर्यावरणपूरक व सर्परक्षण गणेशोत्सव MH29 हेलपिंग हँड चा उपक्रम

पर्यावरण पूरक उत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. गणेश उत्सव काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन नैसर्गिक जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या किंवा शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना केल्यास पर्यावरण रक्षणाला आपण फार मोठा हातभार लावता येऊ शकतो. त्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक गणेश उत्सवातील गणेशाची मूर्ती देखील शाडूमातीची असायला हवी. गणपतीची मूर्ती पर्यावरण पूरक असल्यास ती विसर्जन केल्यानंतर तात्काळ विरघळते, शिवाया जल प्रदुषणाचाही धोका टळतो.

त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्याच्या दृष्टीने मनपूर (मनदेव) गावामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सर्प रक्षण करतांनाचा गणपतीची मूर्ती गावातील शाळकरी मुलांनी व MH29 हेलपिंग हँड टीम ने बनवली बनवली.
साप हा निसर्गातील एक महत्वाचा घटक आहे .सापामुळे मानवाला खूप फायदे होतात .असे मानत गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

Copyright ©