घाटंजी प्रतिनिधी अमोल नडपेलवार
घाटंजी विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार
घाटंजी:-नगर पारिषद कार्यालय चा विद्युत वितरण कंपनी तर्फे विज पुरवठा करण्यात येत होता. परंतु मागिल २ ते ३ वर्षापासुन न.प. कार्यालयाला १००० ते २००० रू. प्रति माहिना याप्रमाणे विद्युत देयक येत होते. व सदरचे विद्युत देयकाचा न.प. कार्यालयातर्फे नियमितपणे भरणा करणा येत आहे. परंतु माहे जुलै २०२२ या महिन्याचे न. प. कार्यालयाला १,१८,००० चे विद्युत देयक देण्यात आले याबाबत अवाढव्य विद्युत देयक दिल्याबद्दल न. प. कार्यालयाने पत्र व्यवहार सुद्धा केले. परंतु सदर कंपनीने पत्राला कोणत्याही प्रकारे उत्तर न देता न. प. कार्यालयाचे विद्युत कनेक्शन बंद केले. ज्या विद्युत मीटर चे प्रति माहीना १००० ते २००० प्रमाणे बिल न. प. ने नियमितपणे भरले त्या एका महिन्याचे विद्युत बिल १,१८,००० कसे झाले या चमत्काराबद्दल विद्युत कंपनीचे आभार मानावे तितके थोडेच. व याउलट नगर परिषद कार्यालयाचे पत्राला उत्तर न देता विद्युत पुरवठा खंडित केला याबद्दल विद्युत वितरण कंपनीचे मुजोरीचे पण कौतुक केले ते थोडेच याउलट न. प. कार्यालयाचे मालमत्ताकर महापारेषण कंपनी वर ४० ते ४२ लक्ष थकीत असून सुद्धा न. प. ने सर्व गाव अंधारात राहील याउद्देशाने कंपनीला सील लावले नाही. तसेच विद्युत वितरण कंपनी ही न. प. चे अधिकृत गाळ्या मध्ये विद्युत कनेक्शन देण्यास टाळाटाळ करण्यात येते. व न. प.हद्दीत सर्व अतिक्रमित जागेवर विद्युत कनेक्शन विद्युत कंपनी तर्फे त्वरित देण्यात येत आहे. याप्रकारे अजब कारभार विद्युत कंपनी तर्फे करण्यात येत आहे.व विद्युत वितरण कंपनीने मुजोरी करून सर्व न. प. कार्यालयाचा दैनंदिन व्यवहार ठप्प केला गणपती मंडळाचे कार्यकर्ते ११ ते २ पर्यंत कार्यालयात कामधंदे सोडून गणपती मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र जरूरी असल्याने रहावे लागले,जन्म मृत्यू प्रमाणपत्र या सारखे कामे प्रभावित केली त्या बद्दल विद्युत वितरण कंपनीचे गावकऱ्याकडून अभिनंदन केल्या जात आहे.
