ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच पोलिसांचा रूट मार्च
गणेश उत्सवाच्या पर्वावर ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच पोलिसांचा रूट मार्च…
ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ अंतर्गत येत आसलेल्या आसेगाव देवी,सावर येथे गणेश महोत्सव निमित्त आज पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आल्याने अनेकावहाच्या नजरा या पोलिसांच्या रुट मार्च मॉक ड्रिल, वर लागल्या होत्या . हे पाहून गावातील गावकरी अंचबित झाले. पोलिसांच्या हि आगळी वेगळी कवायत अनेकांनी पहिल्यांदा अनुभवली अनेक झन मोठ्या आत्मीयतेने पोलिसांकडे बघतच राहिले.या
रूट मार्चचे नियोजन
पोलीस निरिक्षक किशोर जुनघरे, यांनी केले या वेळी उपनिरीक्षक उथाने ,उपनिरीक्षक अमोल ढोकणे, उपनिरीक्षक मनवर मॅडम, व आर. सी. बी ग्रामीण पोलीस स्टेशन चे ६० पोलीस कर्मचारी, आर.सी एफ चे जवान व गृह रक्षक दलाचे जवान आणि आसेगावं देवी येथील पोलीस पाटिल आशिष राउत, सरपंच सचिन चव्हान, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप लुनावत आदी उपस्थित राहून पोलिसाचे स्वागत केलं
