तिरंगा वितरण केंद्राचे दिग्रस नगर पालिकेने केले थाटात उद्घाटन
उद्घाटन प्रसंगी तालुक्याचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती
दिग्रस नगरपालिकेच्या सभागृहात शहीद दिनाचे औचित्य साधून आज,दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता “तिरंगा ध्वज वितरण केंद्राचे” थाटात उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी सुधाकर राठोड होते. तहसीलदार प्रवीण धानोरकर, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, माजी सैनिक प्रकाश नालमवार, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, उद्धव अंबुरे व गोपाल शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्यामुळे उपक्रमशील शिक्षक मजहर अहमद खान यांना सर्वप्रथम ७५ ध्वज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माजी सैनिक प्रकाश नालमवार व इतर मान्यवरांना ध्वज प्रदान करण्यात आले.
तहसीलदार प्रवीण धानोरकर , मुख्याधिकारी सुधाकर राठोड व गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांनी “हर घर तिरंगा अभियान”, राष्ट्रीय ध्वजाचे पावित्र्य व सन्मान आदी विषयावर विस्तृत माहिती दिली. सूत्रसंचालन मयूर दुधे यांनी केले. तर मजहर अहमद खान यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
