आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचा मेळावा दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोज सोमवार सकाळी ११.०० वाजता स्थळ : श्रमशक्ती भवन , आयुर्वेदिक दवाखाण्या जवळ यवतमाळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मेळाव्याचे उदघाटक मा.काॅ.अनिलभाऊ घाटे किसान नेते तथा जिल्हासचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा यवतमाळ, मार्गदर्शक म्हणून मा. काॅ.राजु देसले , राज्याध्यक्ष , आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना ,नाशिक
मा.कॉ.श्यामजी काळे , राज्य सरचिटनिस , आयटक ,नागपुर , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कॉ.विजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष ,आयटक , जिल्हा यवतमाळ प्रमुख अतिथी मा.डाॅ. संघर्ष राठोड ,एम.डी.
जिल्हासचिव, मॅग्मो संघटना तथा वैद्यकीय अधिकारी ,श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ. मा.कॉ. प्रकाश बनसोडे ,राज्य सचिव आयटक , औरंगाबाद मा.कॉ.दिलीप उटाने , राज्यउपाध्यक्ष , आयटक , वर्धा मा.कॉ.वंदना बोंडे ,जिल्हा सचिव आयटक गटप्रवर्तक संघटना यवतमाळ मा.कॉ.सुनिता कुंभारे ,जिल्हा उपाध्यक्ष, आयटक आशा संघटना यवतमाळ हे उपस्थीत राहनार आहे आजवर संघटनेने केलेल्या आंदोलनाची फलश्रुती म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार दरमहा आशांना 6000 हजार रुपये देत आहे व गटप्रवर्तकांना 13100 हजार रुपये देत आहे तेही कामावर आधारीत प्रोस्ताहन भत्ते आहे आणी या वाढत्या महागाईत दोन वेळेचे जेवण सुध्दा होत नाही किमान वेतन अजूनही मीळाले नाही , एका बाजूला आपण निवडून दिलेल्या जनप्रतिनिधी यांना 2 लाखापेक्षा अधिक दरमहा मानधन आहे मरेपर्यंत पेन्शन कायदा करूण घेतला आहे. आपल्याला मात्र वेठबिगारीचे जिवन जगायला लावत आहे. तर आरोग्य विभागाची संपूर्ण धुरा आपल्या आशा व गटप्रवर्तकांच्या खांद्यावर सोपवली आहे, आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन सुध्दा नाही . सामाजिक सुरक्षा नाही ,कामगारांचा दर्जा नाही .या अन्यायाविरुद्ध भविष्यकाळात लढा उभारणे आवश्यक आहे . तसेच प्रशासनाकडून आपल्याला वेळेवर मानधन दिल्या जात नाही. कर्मचारी म्हणून गणना नाही व १५ वर्षापासून कामाचा योग्य मोबदला नाही. म्हणून मागण्या पदरात पाढुन घेण्या करीता पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी यवतमाळ जिल्हात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मागण्या:-आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या , आशा व गटप्रवर्तक कर्मचा-यांना दरमहा किमान वेतन २५,०००/- रुपये द्यावे.
आशा व गटप्रवर्तकांना सामाजिक सुरक्षा लागू करा . गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाणे मानधन/वेतन द्या.इतर कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाने सूसुत्रीकरण व समावेजनात सहभागी करा. आरोग्य खात्यातील ५० % रिक्त जागा प्रात्रतेनुसार आशा व गटप्रवर्तकांन मधुन भरा. दि.२८ जुन २०२२ रोजीचे परिपत्रक जिल्हास्तरावरील अकार्यक्षम आशाचे नियुक्ती आदेश रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करा.इत्यादी मागण्यांना घेवून मेळावा होणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संखेने उपस्थीत राहावे असे आवाहन , किरण कोलवते , विद्या लेंडे ,शीला पाटील ,लता कलाद्रे , निता सोयाम , कुसूम गेडाम , माया इंगोले , ज्योत्स्ना दुधे ,राजाबाई लीखेवार , विजया आत्राम , वणीता देठे , उज्वला पाझारे , ममता शीरसागर ,अरुणा जुनगरे , किरण कांबळे , लक्ष्मी सीडाम , बबीता दोरशेट्टीवार , सुजाता पुनेकार , निर्मला मन्ने , बबीता कुळसंगे , साधना भगत , माया ठमके ,सीमा जाधव , जया सुकळकर , बेबी चव्हाण ,कांता खरवडे , विजेता शेखावत , शोभा राहुलवाड , सुशीला आडे , कौशल्या राठोड , सुजाता बरडे , विजया तायडे , बेबी भारती , संगीता अवगन , शोभा नागोशे , राखी पवार , वंदना बोक्से , गीता जाधव , चंचल केदार , जना तांभारे , शीला भगत ,बबीता चिंचोले , ज्योती भेंडे , वंदना लोणारे, निशा इंगोले , माया इंगोले , अंजना वानखडे , रंजना राऊत , रंजना वानखडे , पपीता कांबळे , सुंनदा कांबळे , प्रतीभा तायडे , कल्पना भवरे , ज्योती गुडेवार , अनिता ठेगने , जयश्री नवाडे , योगीता हेमने , गंगा घुमे,शमशाद पठाण , शैला दातार , मंगला राखुंडे , शबाना शेख , रवीना मुनेश्वर ,आरती वासनिक , हर्षमाला पांडे , यांनी केले आहे अशी माहीती प्रशीध्दी पत्रकाद्वारे काॅ.दिवाकर नागपुरे , जिल्हा सचिव,
आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यवतमाळ यांनी दिली आहे
