भांब (राजा ) येथील राष्ट्रीय महा मार्ग झाल्या पासून येथील ग्रामस्थ अनेक संकटाचा सामना करीत आहे गावाबाजुचा नाला बुजविण्यात आला व ज्या नाल्या काढण्यात आली त्या नाल्या रस्त्याच्या उंच घेन्यात आल्या व तिथे अतिक्रमण असल्याने पावसाचे येणारे पाणी अनेक घरात जात असल्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावर संसार करावा लागत होता या बाबत मागील चार वर्षा पासून शासन दरबारी विविध मार्गांनी पाठपुरावा करीत आंदोलने केली अखेर आज येथील ग्रामस्थानना यश मिळाल्याने कुठे गम तर कुठे खुशी झाल्याने भांब (राजा) येथील अतिक्रमण काढते वेळी जणू जत्रेचे स्वरुप आले होते,अनेकाच्य डोळ्यात अश्रू होते आणि पुराचा सामना करणाऱ्या कुटुंबात आनंदाने चेहऱ्यावर हास्य दिसत होते.अनेक दिवसापासून प्रलंबित समस्या निकाली काढण्यात आली.
या वेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी,तहसीलदार कुणाल झालटे यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, राष्ट्रीय महामार्गाचे माजी पो. नि.चांदांसिंग बयास व अधिकारी कर्मचारी तथा पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



