अंशकालीन स्त्री-परिचरांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री-परिचरांच्या आर्थिक व इतर प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्या करीता आयटकच्या नेतृत्वात दि. २४ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राच्या ठीकाणी नर्सेसना मदत करणाऱ्या अंशकालीन स्त्री-परिचरांना त्यांच्या कामाच्या तुलनेत मीळनारे एकत्रीत मानधन निव्वळ तुटपुंजे असल्यामुळे त्यांच्यावर वेठबिगारीचे जिवन जगण्याची पाळी आली आहे , केंद्र सरकार दरमहा रू.१००/– व राज्य सरकार रू.२९००/– असे एकत्रीत रू.३०००/– मानधन/वेतन देत आहे.त्यात ह्या जिवघेणा महागाईत दोन वेळेचे जेवण सुध्दा भागात नाही.
यापुर्वी अनेक वेळा आंदोलन करून अंशकालीन स्त्री-परिचरांना आरोग्य खात्यात कायम करा रू.१८०००/– वेतन द्या.अशी मुख्य मागणी संघटनेच्या वतीने केली आहे. दि.२० अॉगस्ट २०१४ रोजी मा.आरोग्य संचालक मुंबई यांनी अंशकालीन स्त्री-परिचरांना रू.१००००/–देण्यात यावे अशी शीफारस केली आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.आताही रू.६०००/– देण्याची शिफारस केली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी केली जात नाही हे कटू सत्य आहे. आरोग्य खात्यात अन्य कर्मचाऱ्यांना वेतन क्षेणी सहीत बरेच आर्थिक लाभ मीळतात पण समान कामाला समान वेतन ह्या सुत्रांनुसार अंशकालीन स्त्री-परिचरांना डावलले जाते , अंशकालीन स्त्री-परिचरांना जि.प.सेवत कायम करा, किमान वेतन/मानधन द्या, अंशकालीन स्त्री-परिचर ह्या अर्धवेळ असतांना त्यांचेकडून आरोग्य कर्मचारी पुर्णवेळ काम करून घेतात त्यामुळे त्यांना पुर्णवेळ कर्मचारी करा, वारसांना सेवेत घ्या, पेन्शन योजना लागू करा, गणवेश द्या इत्यादी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनावर दिवाकर नागपुरे ,शोभाताई ढबाले , सुमनताई पाटमासे , बेबीताई कांबळे , सुवर्णा सोनवने , मंगला लंबे ,कुसुमताई मानकर , कल्पना सवाईमुन , शेवंता पवार , साधना गवळी , पुष्पाताई घाटोळे यांच्या सह्या आहे
