Home यवतमाळ माझं गाव फाऊंडेशन स्थापना होताच विकास कामांची सुरुवात

माझं गाव फाऊंडेशन स्थापना होताच विकास कामांची सुरुवात

15

माझं गाव फाऊंडेशन स्थापना होताच विकास कामांची सुरुवात

यवतमाळ तालुक्या अंतर्गत असलेल्या बोथ बोढण या गावातील युवकांनी गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी एक सामाजिक फाउंडेशनची स्थापना केली व गावातील प्रत्येक समस्या निकाली काढण्यासाठी गाव पातळीवर वरील ग्रामस्थानी विश्वासात घेऊन विकास कामाला सुरुवात कण्यात आली , रविवार दिनांक 19जून 2022 रोजी रात्री 7.30 वाजता श्री. खटेश्वर मंदिर, मुख्य चौक बोथ बोडण येथे गावातील सर्व युवक एकत्र येऊन माझं गाव फाऊंडेशन ची स्थापना केली, येणाऱ्या काळात हे फाऊंडेशन रेंन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, सांडपाणी व इतर गाव उपयोगी कामे करणार असल्याचे या सभेत माहिती दिली .
या फाऊंडेशन करिता गावातील ग्रामस्थ व युवक स्वखर्चा मधून तर काही लोक वर्गणी करून गावाच्या विकासाला हातभार लावणार
गावातील राजकारण आणि सत्ताकारणाला कुठेही थारा देणार नसल्याचे स्पष्ट केले हे फाऊंडेशन जनहितार्थ कार्य करणार असल्याने अनेकांचे हात
फाउंडेशन मजबुती करीता पुढे आले च्या पहिल्याच सभेत गावातील बहुतांश सामाजिक कामे करणारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व युवक या वेळी प्रामुख्याने हजर होते आणि सर्वानुमते माझं गाव फाऊंडेशनचे ग्रामस्थानी कौतुक केले पुढील काळात गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता हे फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचा निर्धार केला.

Copyright ©