Home यवतमाळ प्लास्टिक निर्मूलन शाळेचा आठवा रविवार

प्लास्टिक निर्मूलन शाळेचा आठवा रविवार

29

प्लास्टिक निर्मूलन शाळेचा आठवा रविवार

तब्बल मागील 55 दिवसापासून संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, इको लव्हर ग्रुप, एक हात मदतीचा वन्यजीवसाठी ग्रुप च्या वतीने यवतमाळ शहरातील प्रत्येक प्लास्टिकजन्य भागात भल्या सकाळी प्लास्टिक निर्मूलन केल्या जाते,एक अधिकारी ज्यांची कारकीर्द 3 ते 4 वर्षाचीच असते अश्या अधिकाऱ्यांना जर वाटत असेल की यवतमाळ शहर स्वच्छ व प्लास्टिक मुक्त झालं पाहिजे ,अश्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी ह्यांच्या सोबतीने आपण यवतमाळ कर नागरिकांनी का उभे राहू नये?आपल्याला तर संपूर्ण जीवनच ह्या मातीत काढायचे आहे,हाच उद्देश सोबत घेऊन ही ध्येयवेडी मंडळी दर रविवारी शहरात सकाळी दोन तास प्लास्टिक निर्मूलन करून ट्रॅक्टर भर प्लास्टिक गोळा करून नागरप्रशासनाला सोपावतात, व परिसरात प्लास्टिक चा वापर झाल्यास दंड आकारण्यात येईल अशा आशयाचे बॅनर झळकतात,मागील 3 आठवड्यापासून।शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात येत असून ,काल रविवारी एकाच परिसरात असलेल्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय,जिल्हा ग्रंथालय कार्यालय,जिल्हा उपनिबंधक कार्यालय,जिल्हा माजी सैनिक कल्याण कार्यालय,अँटी करप्शन कार्यालय,अर्थ व सांख्यिकी कार्यालय ह्या कार्यालय परिसरातून 1 ट्रॅक्टर भर प्लास्टिक गोळा करण्यात आले,ह्यावेळी संकल्प फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस, वसंत शेळके,अनिल तांबेकर,मनीष इसाळकर,गजेंद्र उन्हाळे,मनोज तामगाडगे,नितीन माटे, रवी ठाकूर,विनोद दोंदल,प्रशांत बोराडे,उदय सरतापे,राहुल दाभाडकर,निलेश ठोंबरे,अरुण चंदरे,श्याम बजाज,महादेव काचोरे,तर छोटे दोन।चिमुकले चि लाभांश बागडीया,चि आराध्य।बजाज,संकल्प वनिता वाहिनीच्या, उपाध्यक्षा वर्षा सरागे,संगीता टिप्रमवार,सीमा सोळंके,कु निकिता बाविस्कर,नयना एम्बरवार,इको लव्हर ग्रुप चे,शिवम चव्हाण,अथर्व भागानगर कर,गणेश उप्परवार, एक हात मदतीचा,वन्य जीवासाठी ग्रुप चे,अभिषेक सीडाम,विकी कोटनाके,गौरव बोरकर,तर अँटी करप्शन कार्यालयाचे ज्ञानेश्वर शेंडे,जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे बालाजी शेंडगे,सैनिकी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षक श्रीमती निंबोरकर, वसंत केंद्रे,जगन्नाथ पापरे आदी उपस्थित होते

Copyright ©