सावळा प्रतिनिधी विकास गजलवार
सावळा ग्रामपंचायत कारभार रीमोड वर
सावळा येथील ग्रा. प.मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये सावळा सरपंच यांनी कबूली दिली कि वरिष्ठ नेत्यांच्या आदेशा नुसारच कामे करावी लागते अशी स्पटोक्ती दिली त्या मुळे सभेत काही काळ गोंधळच उडाला
सावळा ग्रामपंचायत मध्ये आज पर्यंत कोणत्याच प्रकाचे विकासात्मक कामे करण्यात आली नाही आज रोजी झालेल्या सभेमध्ये जलजीवन मिशन संदर्भात सभा असल्याचे सचिव यांनी सांगितले पण गेल्या दीड वर्षात कोरोना मुळे एकही ग्रामसभा झालेली नाही त्यामुळे लोकांनी या सभेत प्रश्न मांडणे हे साहजिकच होते व या आधीसुद्धा गेल्या पाच ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये सदस्यांनी हेच प्रश्न लावून धरले होते परंतु सरपंच व सचिव या मागण्याकडे लक्ष न करता नेत्यांची मर्जी जोपासत जणू काही विकास जाणे नकरण्याची शप्पत घेतली की काय असा सवाल ग्रामस्थांनी केला स्थानिक नेत्यांनी या परिसरात विकास तर केलाच नाही परंतु ज्या ग्रामपंचायत त्यांच्या मर्जीतील आहे तिथेही विकास होत नाही हे ग्रामस्थांचे दुर्दैव आहे.
जि. प.सदस्यांच्या जि. प. मार्फत आलेले बाकडे गावात न ठेवता चक्क सरपंचांच्या घरी व शेतात तसेच काहि निकटवरतीय लोकांच्या घराजवळ काहि लोकांच्या ओट्यावर पहावयास मिळत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे आले त्यामुळे सावळा ग्रामपंचायत सदस्य वंदना गझलवार, राधा उईके, शांता भगत व शिवसेनेचे शाखाप्रमुख रवि गझलवार यांनी हा सर्व प्रकार ग्रामसभेत उघडकीस आणला व या सर्व विषयांचे लवकरात लवकर समाधान न केल्यास जिल्हा पातळीवर याची तक्रार करण्याचां इशारा या वेळी देण्यात आला. सावळा ग्रामपंचायत मध्ये मागील दीड वर्षात एकही विकास काम करण्यात आले नसल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे.
