गोकुल खडसे प्रतिनिधी
शहीद-ए- आझम भगतसिंग विचार मंचाच्या वतीने रक्तदान करून शहीद भगतसिंग यांना आदरांजली
हुतात्मा चौक, यवतमाळ
येथे शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून स्थानिक *शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमंच यवतमाळ* द्वारा अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ तहसीलचे तहसीलदार कुणाल झाल्टे , प्रमुख अतिथी म्हणून वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे , ए.पी.आय बावीस्कर ह्या उपस्थित होत्या.
भारत मातेला पारतंत्र्याच्या बेड्यातुन मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहीदांना अभिवादन म्हणून. विचार मंचाच्या वतीने रक्तदान करण्यात आले. यानंतर सायंकाळच्या सुमारास हुतात्मा स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी आजच्या तरुणांनी भारतीय स्वातंत्र लढ्याचा ईतिहास समजून घेणे आवश्यक असून, आजच्या तरुणाईचे आदर्श बदलत चालले आहे. त्यामुळे तरुणांनी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यांनी दाखविलेल्या वाटेवर मार्गक्रमण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी राजीवगांधी पंचायत राज समितीचे राज्य अध्यक्ष संजय ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य विष्णु उकंणे, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुल खडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदकिशोर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहीदे आझम भगतसिंग विचार मंचाचे प्रद्युम्न जावडेकर, उदय सरतापे, विजय तायडे, प्रा. पंढरी पाठे, प्रविण देशमुख, श्रीजीत डफळे यांनी विशेष परिश्रम घेतले
