Home यवतमाळ रूग्ण कल्याण समीती सफाई कामगार/परीचर संघटनेची सभा संपन्न

रूग्ण कल्याण समीती सफाई कामगार/परीचर संघटनेची सभा संपन्न

10

रूग्ण कल्याण समीती सफाई कामगार/परीचर संघटनेची सभा संपन्न

यवतमाळ:- दि.१९ मार्च रोजी श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे रूग्ण कल्याण समीती सफाई कामगार/परीचर संघटना यवतमाळ जिल्हा सभा कॉ.विजय ठाकरे जिल्हाध्यक्ष , आयटक यांचे अध्यक्षतेखाली तर कॉ. दिवाकर नागपुरे, कार्याध्यक्ष,आयटक , कॉ.संजय भालेराव ,जिल्हसचीव , आयटक , यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी रूग्ण कल्याण समीती अंतर्गत काम करणारे सफाई कामगार/परीचर यांनी आपल्या व्यथा मांडल्या तसेच मीळणारे मानधन अतीशय तुटपुंजे असुन त्यात उदरनिर्वाह चालवता येत नाही सध्या दरमहा तीन हजार रूपये नियमीत मानधन मीळत आहे त्यात वाढ होने महत्वाचे आहे त्या करीता दि.२९ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात यावा असे सर्वांनी मत व्यक्त केले आयटकच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पुढीलप्रमाणे तदर्थ कमेटी गठीत करण्यात आली कॉ.दिवाकर नागपुरे, जिल्हाध्यक्ष , संजय चवरे , उपाध्यक्ष तर अमोल मनवर , जिल्हासचिव म्हणून निवड करण्यात आली तर कार्यकारिणी सदस्य म्हणून पुष्पाबाई दिवेकर , गोदाबाई पंडघने , रमेश बलखंडे , संजय जाधव,धुर्पताबाई ससाने , आरीफ शेख , श्रीकांत वायदंडे, रामसिंग आंद्रजित , अरवींद गरडे , अक्षय इंगळे , किरण पाईकराव , आशीष बावने , अंनता पाचपोहर , निवड करण्यात आली.

Copyright ©