Home यवतमाळ शिवजयतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवजयतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

13

शिवजयतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवराय प्रतिष्ठान हिवरी यांच्यावतीने श्रीकृष्ण मंदिर येथे भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तिथी प्रमाणे येणाऱ्या शिवजयंती निमित्त या रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे २१ मार्च ला सकाळी १० वाजता पासुन हे शिबिर सुरू करण्यात येणार आहे.
शासकीय रुग्णालयातील रक्ताचा पुरवठा अपुरा असल्याने अनेक गरीब गरजू रुग्णांना रक्त मिळत नसल्याने हिवरी येथील तरुणांनी पुढाकार घेत शिवजयंती चे निमित्त करून महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे जेणे करून याचा लाभ गरजू गरीब रुग्णांना याचा लाभ मिळेल व काहीच तरी प्राण वाचविण्यास मदत होईल या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्त दात्यांनि रक्त दान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर प्रज्वल, जैस्वाल,अजिंक्य धांदे,विशाल बोरकर,कुंदन महेर, विवेक ठाकरे,कुणाल वाघाडे,विक्रम नेवारे,नितीन शेलोकार,सौरभ वाघाडे,अजित राऊत,शुभम ससनकर,सचिन मानकर,आश्विन कूमरे,गणेश मारबते,मारोती आत्राम इत्यादि विशेष परिश्रम घेत आहे.

Copyright ©